Ruturaj Gaikwad Said MA Chidambaram Stadium Have A Different Pitch Ahead Of LSG vs MI Eliminator IPL 2023; ऋतुराजने रोहितला दिली पिचबद्दल मोठी अपडेट, मुंबई इंडियन्ससमोर चेपॉकवर मोठे आव्हान

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

चेन्नई: आयपीएल २०२३ मधील प्लेऑफचे सामने सुरु झाले आहेत. यातील पहिला क्वालिफायर सामना २३ मे रोजी चेन्नई आणि गुजरात यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात चेन्नईने १५ धावांनी सामना जिंकत थेट आयपीएल २०२३ च्या अंतिम फेरीत धधक मारली आहे. तर आज बुधवारी २४ मे रोजी एलिमिनेटर सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ चेपॉकच्या मैदानावर खेळणार आहेत. पण तत्पूर्वी ऋतुराज गायकवाडने या मैदानाच्या पिचबद्दल रोहितचे टेन्शन वाढवणारी माहिती दिली आहे.पहिल्या क्वालिफायरमधील विजयानंतर ऋतुराज गायकवाडने ज्या गोष्टी सांगितल्या त्या खेळपट्टीचा खुलासा करणाऱ्या आहेत. सीएसकेच्या सलामीवीराच्या मते, चेन्नईची खेळपट्टी ३-४ सामन्यांपर्यंत वेगळी होती आणि आता वेगळीच आहे.

काय म्हणाला ऋतुराज

चेन्नईच्या खेळपट्टीवर गुजरात टायटन्सविरुद्ध ६० धावांची खेळी केल्यानंतर समाधानी दिसणारा ऋतुराज म्हणाला, “चेन्नईतील शेवटचे ३-४ सामने पूर्णपणे वेगळे होते. या सामन्यादरम्यान जे दिसून आले ते सुरुवातीच्या सामन्यांमध्ये दिसले नव्हते. इथली सुरुवातीची खेळपट्टी चांगली होती. पण आता जी खेळपट्टी दिसत आहे, ती खूपच वेगळी आहे. या खेळपट्टीवर तुम्हाला खूप चांगले खेळावे लागेल.”

रोहित शर्मासमोर टेन्शन

चेन्नई हे आयपीएलमध्ये सीएसकेचे होम ग्राउंड असल्याने त्यांनी त्यांचा सामना जिंकून अंतिम फेरीचे तिकीट बुक केले. पण, रोहित शर्मा एलिमिनेटर जिंकल्यानंतर क्वालिफायर २ खेळण्यासाठी अहमदाबादला कसा पोहोचणार, हा आता मोठा प्रश्न आहे. कारण मैदानावर खेळण्यापूर्वी त्यांना खेळपट्टीचा मूड नीट समजून घ्यावा लागतो.

अडचण खेळपट्टीच्या मूडसह परिस्थितीची चाचणी घेण्याची आहे. कारण दोनदा चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीची याबाबत फसवणूक झाली आहे. ज्या चेन्नईच्या खेळपट्टीवर पहिला क्वालिफायर खेळला गेला होता तिथे धोनीला प्रथम फलंदाजी करायची होती कारण नंतर त्याच्या मते दव पडेल. पण दव न पडल्याने नाणेफेक गमावणेच बरे, असे त्याला समजले.

अंबानींनी अख्खी पर्स रिकामी केली, पोलार्डची कसर भरुन काढली आणि चेन्नईलाही जशास तसं उत्तर दिलं

त्याचप्रमाणे CSK ने पंजाब किंग्ज विरुद्ध या खेळपट्टीवर पहिला सामना खेळला तेव्हा धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. दव पडणार नाही असे त्यांना वाटत होते. पण त्या सामन्यादरम्यान दव पडले आणि चेन्नईने २०० धावा करूनही सामना गमावला.

आता असा त्रास चेन्नईतील मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्सवरही होणार असून, त्यासाठी रोहित शर्मा आणि कृणाल पांड्याला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

[ad_2]

Related posts