[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
भारताचे सामने नेमके कधी आणि कुठे होणार, जाणून घ्या…
आशिया चषकात भारताचा पहिला सामना हा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानबरोबर होणार आहे. हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील पलेक्कल येथे होणार आहे. हा सामना दुपारी ३.०० वाजता सुरु होणार आहे. या स्पर्धेतील भारताचा दुसरा सामना हा नेपाळशी होणार आहे. भारत आणि नेपाळ यांच्यातील सामना हा ४ सप्टेंबरला पलेक्कल येथेच होणार आहे. या स्पर्धेतील भारताचे सर्व सामने हे श्रीलंकेत होणार असून भारतीय संघ पाकिस्तानात खेळायला जाणार नाही.
आशिया चषकातील सामने किती वाजता सुरु होतील…
आशिया चषकातील सामन्यांसाठी पंच हे दुपारी १.३० वाजता पाहणी करतील. त्यानंतर दोन्ही संघातील खेळाडू मैदानात उतरून सरान करू शकतात. जर पाऊस नसेल किंवा पावसामुळे मैदान ओले नसेल तर दुपारी २.३० वाजता टॉस करण्यात येईल. टॉस झाल्यावर दोन्ही संघांचे कर्णधार आपले संघ जाहीर करतील. त्यानंतर दोन्ही संघांतील खेळाडू सामन्याच्या तयारीला लागतील. टॉसनंतर काही वेळात दोन्ही संघ दाखल होतील. टॉसनंतर अर्ध्या तासाने म्हणजे दुपारी ३.०० वाजता आशिया चषकातील सामन्यांना सुरुवात होणार आहे.
आशिया चषकातील सामने लाइव्ह कुठे पाहायला मिळू शकतात, जाणून घ्या…
आशिया चषकातील सामने टीव्ही आणि अॅपवरही पाहायला मिळणार आहेत. आशिया चषकातील सर्व सामने हे स्टार स्पोर्ट्स या चॅनेलवर पाहायला मिळणार आहेत. दुपारी २.०० वाजल्यापासून या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण Star Sports वर पाहायला मिळतील. त्याचबरोबर Disney+ Hotstar वरही हे सामने लाइव्ह पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आशिया चषकाचा आनंद आता चाहत्यांना स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टारवर पाहता येणार आहे. आशिया चषकातील सामने हे पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन देशांत होणार आहेत. पण भारताचे सर्व सामने मात्र श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत.
भारतीय संघात कोणाला मिळाली संधी…
आशिया कपसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, विराट कोहली, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा. संजू सॅमसन (राखीव खेळाडू)
के एल राहुल हा आता या स्पर्धेतील दोन सामने खेळू शकणार नाही, अशी माहिती प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिली आहे.
आशिया चषक समजली जात आहे रंगीत तालीम…
आशिया चषक स्पर्धा ही वर्ल्ड कप २०२३ ची रंगीत तालीम समजली जात आहे. कारण आशिया चषक वनडे प्रकारात खेळवला जाणार आहे. त्यामुळे वर्ल्ड कपपूर्वी ही स्पर्धा आशियातील देशांसाठी चांगली रंगीत तालीम ठरू शकते. त्यामुळे आता या स्पर्धेत कोणता संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. त्याचबरोबर भारतीय संघातील कोणते खेळाडू कशी कामगिरी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
आशिया चषक स्पर्धेत काय आहे सुपर -४
आशिया चषक स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी होणार आहेत. या सहा संघांना दोन गटांत विभागले गेले आहे. प्रत्येक गटात तीन संघ असणार आहेत. सुपर ४ मध्ये १० सप्टेंबरला पुन्हा मोठी लढत होऊ शकते. अ गटातील अव्वल २ संघ कोलंबोमध्ये भिडतील. म्हणजेच भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा लढाई होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, १२ सप्टेंबर रोजी, अ गटातील दुसऱ्या क्रमांकावरील संघ कोलंबोमध्ये ब गटातील अव्वल स्थानी असलेल्या संघाशी आणि १५ सप्टेंबरला ब गटातील दुसऱ्या क्रमांकावरील संघाशी भिडणार आहे.
चाहत्यांसाठी पर्वणी…
आशिया चषक स्पर्धा ही चाहत्यांची पर्वणी असेल. कारण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने बऱ्या दिवसांनी पाहायला मिळणार आहेत.
[ad_2]