[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
IND vs PAK Asia Cup 2023 Live Streaming : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकातील सामना शनिवारी होणार आहे. पाकिस्तानने सलामीच्या लढतीत नेपाळचा पराभव करत स्पर्धेची सुरुवात दणक्यात केली. भारताचा आशिया चषकातील हा पहिलाच सामना असेल. नेपाळविरोधात २३८ धावांनी विजय मिळवणाऱ्या पाकिस्तान संघाचा आत्मविश्वास नक्कीच उंचावलेला असेल. पण भारतीय संघही कमालीचा फॉर्मात आहे. जसप्रीत बुमराह आणि अय्यरच्या आगमनामुळे टीम इंडियाची ताकद वाढली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थरार फुकटात पाहायची संधी आहे.
2019 नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकदिवसीय सामना होत आहे. २०१९ च्या विश्वचषकात अखेरीस भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने बाजी मारली होती. आशिया चषकात भारतीय संघ संपूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे. आगामी एकदिवसीय विश्वचषकापूर्वी सर्व खेळाडूंची चाचपणी करण्याची ही एक उत्तम संधी असेल. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माशिवाय विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह टीम इंडियासाठी महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतील.
कुठे होणार सामना ? –
बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात ज्या मैदानावर सामना झाला तिथेच भारत आणि पाकिस्तानची लढत होणार आहे. कँडी येथील पल्लेकेले स्टेडियमची खेळपट्टी सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना मदत करते.
किती वाजता सुरु होणार ?
भारतीय वेळेनुसार, दुपारी तीन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. दुपारी अडीच वाजता नाणेफेक होईल.
फुकटात पाहा सामना –
टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात खेळवण्यात येणारा महामुकाबला भारतात स्टार स्पोर्ट्समार्फत टीव्हीवर लाईव्ह दाखवण्यात येणार आहे. टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील हा हायव्होलटेज सामना डिस्ने प्लस हॉटस्टारवर विनामूल्य थेट प्रसारित केला जाईल. मात्र, मोफत लाईव्ह स्ट्रिमिंग सुविधा केवळ मोबाईल युजर्ससाठी असेल. तुमच्या मोबाईलमध्ये हॉटस्टारचे अॅप असेल तर तुम्ही मोफत सामना पाहू शकता तुम्हाला कोणतेही शुल्क भरण्याची गरज नाही. त्याशिवाय एबीपी माझाच्य संकेतस्थळावर सामन्यासंदर्भात सर्व माहिती तुम्हाला मिळेल.
पाकिस्तानची संभाव्य प्लेईंग 11
इमाम उल हक, फखर जमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), इफ्तिखार अहमद, सलमान आगा, मोहम्मद नवाज, शादाब खान, हारिस रऊफ, नसीम शाह आणि शाहिन शाह आफ्रिदी
भारताची संभाव्य प्लेईंग 11
ईशान किशन (विकेटकीपर), शुभमन गिल, विराट कोहली, रोहित शर्मा(कर्णधार), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
[ad_2]