If Rain Interrupts Ind Vs Pak Asia Cup 2023 Match Minimum 20 Overs Match Necessary For A Result To Be Declared

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

India vs Pakistan, Asia Cup 2023 : शनिवारी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय होल्टेज सामन्यात पावासाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रंगतदार सामना पल्लेकेले स्टेडियममध्ये पार पडणार आहे. बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघाने आशिया चषकाची सुरुवात दणक्यात केली आहे. पाकिस्तानने पहिल्याच सामन्यात नेपाळचा २३८ धावांचा पराभव केला. या विजयामुळे पाकिस्तानचा आत्मविश्वास वाढलेला असेल. पण भारतीय संघही दमदार फॉर्मात आहे. दोन्ही संघ विजयासाठी मैदानात उतरतील.. 

पावसाची शक्यता – 

कँडीमध्ये शनिवारी पाऊस कोसळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पावसामुळे सामन्यात व्यत्यय येण्याची शक्यता आहे. हवमान विभागाच्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ५१ टक्के पावसाची शक्यता आहे. तर दुपारी ७० टक्के पाऊस कोसळू शकतो. संध्याकाळी पावसाचा अंदाज नाही. पावसामुळे सामन्यात व्यत्यय येण्याची दाट शक्यता आहे

पावसामुळे व्यत्यय आल्यास काय ?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात डकवर्थ लुईस नियमांचा वापर होण्याची दाट शक्यता आहे. वनडे सामन्याचा निकाल लागण्यासाठी कमीत कमी २०-२० षटकांचा खेळ होणं, अनिवार्य आहे.  कँडी येथे शनिवारी 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता 60 टक्के पावसाची शक्यता आहे.  

सामना रद्द झाल्यास काय ? 

मुसळधार पावसामुळे सामना रद्द झाल्यास भारत आणि पाकिस्तान संघाला प्रत्येकी एक एक गुण दिले जातील. अशा स्थितीमध्ये पाकिस्तानचा संघ सुपर ४ साठी पात्र होईल.  दुसरीकडे भारताला साखळी फेरीतील अखेरचा सामना जिंकावाच लागणार आहे. आशिया चषकातील भारताचा अखेरचा साखळी सामना नेपाळविरोधात आहे.  नेपाळचा पराभव केल्यासच भारताचा सुपर ४ मध्ये प्रवेश होईल.  

हेड टू हेट स्थिती काय ?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या हायहोल्टेज सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आतापर्यंत 132 एकदिवसीय  सामने झाले आहेत. ज्यामध्ये भारताने 55 सामने जिंकले आहेत आणि पाकिस्तानने 73 सामने जिंकले आहेत.

हायव्होलटेज सामन्यात कोण बाजी मारणार ?

आशिया कप स्पर्धेतील टीम इंडियाचा हा पहिलाच सामना असेल. तर पाकिस्तानचा दुसरा सामना असेल. पाकिस्ताननं आपला पहिला सामना नेपाळविरुद्ध खेळला आहे. या सामन्यात पाकिस्ताननं धमाकेदार विजय मिळवला आहे. यापूर्वी 2022 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आले होते, ज्यामध्ये टीम इंडियानं बाजी मारली होती. आणि 2 सप्टेंबरला आशिया कप स्पर्धेत खेळला जाणारा टीम इंडिया-पाकिस्तानचा हायव्होलटेज सामन्यात कोण बाजी मारणार ? याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेय.

पाकिस्तानची संभाव्य प्लेईंग 11

इमाम उल हक, फखर जमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), इफ्तिखार अहमद, सलमान आगा, मोहम्मद नवाज, शादाब खान, हारिस रऊफ, नसीम शाह आणि शाहिन शाह आफ्रिदी 

भारताची संभाव्य प्लेईंग 11 

ईशान किशन (विकेटकीपर), शुभमन गिल, विराट कोहली, रोहित शर्मा(कर्णधार), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

[ad_2]

Related posts