Gautam Gambhir On Viral Video Crowd Chanting Kohli What Shown On Social Media Has No Truth IND Vs NEP Asia Cup 2023

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Gautam Gambhir Reaction When Crowd Was Teasing Him : भारत आणि नेपाळ यांच्यातील सामन्यादरम्यान गौतम गंभीर यांची प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरली आहे. या सामन्यातील कॉमेंट्री पॅनलचा भाग असलेला भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. सामन्यादरम्यान गंभीर मैदानात जात असताना प्रेक्षकांनी कोहली-कोहलीच्या घोषणा देण्यास सुरुवात केल्याचे व्हिडीओत दिसतेय.त्यावर गंभीरने संतप्त प्रतिक्रिया देत मधले बोट दाखवले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर गौतम गंभीर याने याबाबत स्पष्टीकरणही दिलेय. सोशल मीडियात जे दाखवले जाते, ते सत्य नसते… असे गौतम म्हणाला.

2013 मध्ये आयपीएल सामन्यादरम्यान गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर 2023 आयपीएलमध्येही गंभीर आणि कोहली यांच्यात मैदानावर जोरदार बाचाबाची झाली होती. आयपीएलच्या काही सामन्यानंतर चाहत्यांनी कोहली कोहलीच्या घोषणा दिल्या होत्या. 

पाहा व्हिडीओ…

गौतम गंभीर काय म्हणाले ?

सोशल मीडियात जे दाखवले जाते ते सत्य नसते. सोशल मीडियावर लोक त्यांना जे दाखवाचे ते दाखवतात. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओपेक्षा सत्य वेगळे आहे. स्टेडिअमध्ये असणाऱ्या पाकिस्तानी लोकांकडून भारतविरोधी घोषणा दिल्या जात होत्या. त्यामुळे माझी तशी प्रतिक्रिया आली, असे गौतम गंभीर यांनी व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर सांगितले. 

दोन अथवा तीन पाकिस्तानी लोक होते. ते भारताविरोधात घोषणा देत होते. जम्मू काश्मिरबद्दल घोषणा देत होते. देशाविरोधात काही असेल तर मी ऐकू शकत नाही. त्यामुळे माझी तशी प्रतिक्रिया आली. सामना पाहायला आल्यानंतर तुम्ही संघाला सपोर्ट करा.. तिथे राजकीय प्रतिक्रिया द्यायची गरज नाही, असे गौतम गंभीर म्हणाले. 

गौतमचं स्पष्टीकरण… पाहा व्हिडीओ

नेपाळची झुंजार फलंदाजी –

आसिफ शेख याचे अर्धशतक आणि सोमपाल कामी याच्या झुंजार फलंदाजीच्या जोरावर नेपाळने 230 धावसंख्येपर्यंत मजल मारली. आसिफ शेख याने 58 धावांची झुंजार खेळी केली तर सोमपाल कामी याने वादळी 48 धावा कुटल्या. भारताकडून रविंद्र जाडेजा आणि मोहम्मद शामी यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. भारताला विजयासाठी 231 धावांचे आव्हान आहे. भारताच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात करत नेपाळला जोरदार प्रत्युत्तर दिलेय. पण सामन्यात पावसाने खोडा घातला आहे. 



[ad_2]

Related posts