[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
भारतीय संघाने या सामन्यात रोहित शर्मा आणि शुभमन गिल या दोघांच्या अर्धशतकांच्या जोरावर १० विकेट्स राखून विजय साकारला. भारतासाठी हा मोठा विजय होता. त्यामुळे या गोष्टीचा फायदा भारताला गुणतालिकेत होईल, असे म्हटले जात होते. या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा संघ हा ३ गुणांसह पहिल्या स्थानावर होता, तर भारताचा संघ एका गुणासह दुसऱ्या स्थानावर होता. या सामन्यात भारताने मोठा विजय साकारला, त्यामुळे त्यांना दोन गुण मिळाले. त्यामुळे गुणतालिकेत भारत आणि पाकिस्तान या दोघांचे समान तीन गुण झाले आहेत.
या विजयानंतर भारत आणि पाकिस्तान यांचे गुणतालिकेत समान गुण झाले असले तरी अव्वल स्थानासाठी नेट रन रेट हा महत्वाचा असतो. भारताने पहिल्या सामन्ययात नेपाळवर २३८ धाावंनी विजय मिळवला होता. त्यामुळे या गुणतालिकेत पाकिस्तानचा रन रेच हा ४.७६० असा झाला होता. दुसरीकडे भारताने आपल्या दुसऱ्या सामन्यात नेपाळवर १० विकेट्स राखून दमदार विजय मिळवला. त्यामुळे त्यांना दोन गुण तर मिळाले आणि त्यांचा रन रेट हा १.०२८ असा झाला आहे. भारत आणि पाकिस्तान यांचे समान तीन गुण असले तरी नेट रन रेटच्या जोरावर आता पाकिस्तानने गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले आहे, तर भारताला आता दुसऱ्या स्थानावरर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संघ हा अव्वल स्थानासह सुपर ४ या फेरीत दाखल झाला आहे. दुसरीकडे भारतही सुपर ४ फेरीत दाखल झाला असला तरी ते दुसऱ्या स्थानावर राहिले आहेत.
भारत आणि पाकिस्तान यांचे गुणतालिकेत समान ३ गुण आहेत. पण तरीही नेट रन रेटच्या जोरावर पाकिस्ताने गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले आहे.
[ad_2]