Sri Lanka and KKR cricketer Sachithra Senanayake arrested over match-fixing accusations ; विजयानंतर श्रीलंकेसाठी वाईट बातमी, मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली दिग्गज खेळाडूला अटक

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : श्रीलंकेने काल (मंगळवारी) अफगाणिस्तानवर विजय साकारला. या विजयासह श्रीलंकेच्या संघाने आशिया कपच्या सुपर ४ फेरीत प्रवेश केला आहे. पण या विजयानंतर आता श्रीलंकेसाठी वाईट बातमी आली आहे. कारण श्रीलंकेचा मॅचविनर खेळाडू आता मॅच फिक्सिंगमध्ये दोषी सापडला आहे. त्यामुळे आता या खेळाडूला मॅच फिक्सिंगच्या आरोपांखआली अटकही करण्यात आली आहे.

श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सचित्रा सेनानायकेला बुधवारी मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. आज सकाळी शरणागती पत्करल्यानंतर त्याला क्रीडा भ्रष्टाचार अन्वेषण युनिटने अटक केली. तीन आठवड्यांपूर्वी त्याला परदेशात जाण्यास न्यायालयाने बंदी घातली होती. सेनानायके याच्यावर लंका प्रीमियर लीगच्या (LPL) 2020 साली झालेल्या हंगामात मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता, जिथे त्याने दोन खेळाडूंना मॅच फिक्स करण्यासाठी प्रलोभित केले होते.

३८ वर्षीय खेळाडूने २०१२ ते २०१६ या कालावधी दरम्यान एक कसोटी, ४९ एकदिवसीय सामने आणि २४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. आयपीएल २०२३ मध्ये त्याने कोलकाता नाइट रायडर्सकडून आठ सामनेही खेळले. कोलंबोच्या मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने तीन महिन्यांच्या कालावधीसाठी लागू होणारी प्रवासी बंदी लागू करण्याचे आदेश दिले होते. कोर्टाला आज सांगण्यात आले की अॅटर्नी जनरल विभागाला क्रीडा मंत्रालयाच्या विशेष तपास युनिटने माजी ऑफस्पिनरवर फौजदारी आरोप निश्चित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज सचित्राला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्याला आता किती शिक्षा सुनावली जाईल, हे अजून समोर आलेले नाही. पण त्याची क्रिकेटची कारकिर्द मात्र नक्कीच संपुष्टात आली आहे. कारण मॅच फिक्सिंगचे आरोप सिद्ध झाल्यामुळे आता त्याला श्रीलंकेचे क्रिकेट मंडळ थारा देणार नाही. त्यामुळे त्याला आता श्रीलंकेत क्रिकेट खेळता येणार नाही. त्याचबरोबर अन्य देशांमध्ये क्रिकेट खेळण्यासाठीचे पत्रही त्याला श्रीलंकेचे क्रिकेट मंडळ देणार नाही, त्यामुळे आता त्याची क्रिकेट कारकिर्द संपुष्टात आली आहे.

धोनीला वाढदिवसानिमित्त आंध्र प्रदेशच्या चाहत्यांचे खास गिफ्ट; उभारला 41 फुटांचा कटआऊट

श्रीलंकेचा क्रिकेटपटू सचित्रा सेनानायके याला आता मॅच फिक्सिंगच्या आरोपांखाली अटक करण्यात आली आहे. आता त्यानंतर श्रीलंका क्रिकेट मंडळ कोणते ठोस पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

[ad_2]

Related posts