Spyware Alert In Iphone Tech Marathi News Pegasus Can Listen Your Conversation Do This Work To Avoid It

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

iPhone Spyware Alert : काही महिन्यांपूर्वी पेगाससकडून (Pegasus) हेरगिरीचे प्रकरण भारतात गाजले होते, त्यामुळे संसदेपासून ते राजकीय पक्षांमध्ये बरीच चर्चा झाली होती. नेमके हेच प्रकरण आता आयफोनच्या (iPhone) बाबतीत समोर येत आहे, आयफोनमध्ये पेगासस स्पायवेअर सॉफ्टवेअर (iPhone Spyware Software) बसवले जात असल्याचा दावा केला जात आहे, जे यूजर्सची हेरगिरी करत आहे.

टोरंटोच्या सायबर रिसर्च टीम सिटीझन लॅबची माहिती
आयफोनमधील पेगाससची माहिती टोरंटो विद्यापीठातील सायबर रिसर्च टीम सिटीझन लॅबने दिली आहे, यासोबतच सिटीझन लॅबने आयफोन आणि अ‍ॅपल उपकरण वापरणाऱ्यांना इशारा दिला आहे. लॅबकडून सांगण्यात येत आहे की, त्यांनी त्यांचे फोन आणि इतर उपकरणांचे संरक्षण केले पाहिजे. त्वरित अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे.

पेगासस बद्दल कसे कळले?
सोशल मीडीयावरील एका पोस्टमध्ये, सिटीझन लॅबने अहवाल दिला की, यूएस राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये गेल्या आठवड्यात एका व्यक्तीच्या डिव्हाइसची तपासणी करताना, सिटीझन लॅबला NSO समूहाद्वारे वितरित केलेले पेगासस स्पायवेअर डिव्हाइसमधील शून्य-क्लिक असुरक्षा वापरत असल्याचे आढळले.

 
स्पायवेअर कसा हेरगिरी करतो?
सिटीझन लॅबने या स्पायवेअरला BLASTPASS म्हटले, जे युजर्सना नकळत iOS (16.6) नव्या व्हर्जनवर चालणाऱ्या आयफोनला हानी पोहोचवू शकते, म्हणजे यूजर्सचा फोन हॅक होईल आणि त्यांना कळणारही नाही. सिटिझन लॅबने अॅपलला या मालवेअरची माहिती दिली, अॅपलने लगेचच त्याचे निराकरण करण्यासाठी विशेष अपडेट जारी केले. हे अपडेट iPhone, iPad, Mac कॉम्प्युटर आणि स्मार्टवॉचसह सर्व उत्पादनांसाठी आहेत.

स्पायवेअरपासून संरक्षण कसे करावे?
अ‍ॅपलने आपल्या यूजर्सला ताबडतोब आयफोन, आयपॅड, मॅक बुक आणि अ‍ॅपल वॉच अपडेट करण्याचा इशारा दिला आहे. तसेच अ‍ॅपलच्या या तत्काळ कारवाईचे सिटीझन लॅबने कौतुक केले आहे.

 

 

[ad_2]

Related posts