India Vs Pakistan Match Preview Asia Cup 2023 India Playing Against Pakistan When And Where To Watch Team Squads And Other Details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

India vs Pakistan Match Prediction : आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये पुन्हा थरार होणार आहे. या लढतीला आता आवघे काही तास शिल्लक आहेत. साखळी फेरीत पावसाने खोडा घातला होता, त्यामुळे लढत रद्द करावी लागली होती. या हायहोल्टेज सामन्याकडे क्रीडा चाहत्यांचे लक्ष लागले आहे. रविवारी या सामन्याला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी पिच रिपोर्ट, प्लेईंग ११ अन् इतर बाबी जाणून घेऊयात..

कशी आहे खेळपट्टी ? 

तीन दिवसांपासून कोलंबोमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे खेळपट्टी आणि मैदानावर परिणाम झालेला असू शकतो. रविवारीही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रेमदासा स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजांना पोषक आहे. मैदानाची आऊटफिल्डही वेगवान आहे. त्यामुळे पावसाने उसंत घेतली तर धावांचा पाऊस पडेल.

कुठे अन् कधी होणार सामना ?

आशिया कपमध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होलटेज सामना 10 सप्टेंबर रोजी रविवारी खेळवण्यात येणार आहे. श्रीलंकेतील कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, या महामुकाबल्याची सुरुवात दुपारी 3 वाजता होणार आहे.  तर दुपारी 2.30 वाजता नाणेफेक होणार आहे. सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पावसाची शक्यता – 

रविवारी कोलंबोध्ये दिवसभर पाऊस कोसळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सामन्यात व्यत्यय येण्याची शक्यता आहे. हवमान विभागाच्या माहितीनुसार, रविवारी सकाळपासूनच पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. दिवसभरात सरासरी 70 टक्केंपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.

भारत-पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस 

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना वगळता आशिया चषक 2023 स्पर्धेतील कोणत्याही सामन्यासाठी राखीव दिवस नाही. आशिया चषकाच्या अंतिम सामन्यालाही राखीव दिवस नसल्याचे समोर आले आहे.त्यामुळे आशिया चषक स्पर्धा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, अंतिम सामना आणि सुपर-4 फेरीतील भारत आणि पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस (Reserve Day) ठेवण्यात आला आहे. हे दोन्ही सामने जेव्हा सुरू होतील, त्याच दिवशी संपवण्याचा प्रयत्न केला जाईल. यासाठी सामना छोटा झाला, तरीही त्याच दिवशी संपवला जाईल. असे असूनही सामना पूर्ण झाला नाही, तर दुसऱ्या दिवशी जिथे सामना रोखण्यात आला होता, तिथूनच सुरू केला जाईल. 

कुणाचे पारडे जड – 

भारत आणि पाकिस्तानचा सामना म्हटले की चाहत्याच्या नजरा सामन्याकडेच असतात. एक काळ असा होता की, भारताची फलंदाजी आणि पाकिस्तानची गोलंदाजी असा सामना असायचा… पण आता पाकिस्तानच्या तोडीस तोड भारताची गोलंदाजी आहे आणि भारताच्या फलंदाजीला आव्हान देणारी पाकिस्तानची फलंदाजी आहे. त्यामुळे सामना रंगतदार होईल.  जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज पाकिस्तानच्या गोलंदाजापेक्षा कमी नाहीत. पाकिस्तानची फलंदाजीही दमदार आहे.  बाबर आझम, मोहम्मद रिझवान, सलमान अली आगा आणि इमाम उल हक शानदार फॉर्मात आहेत. इफ्तिखारही रंगात आहे. शनिवारी रोमांचक सामना होईल. दोन्ही संघ तुल्यबळ दिसत आहेत.  

पाकिस्तानची संभाव्य प्लेईंग 11

इमाम उल हक, फखर जमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), इफ्तिखार अहमद, सलमान आगा, मोहम्मद नवाज, शादाब खान, हारिस रऊफ, नसीम शाह आणि शाहिन शाह आफ्रिदी 

भारताची संभाव्य प्लेईंग 11 

शुभमन गिल, विराट कोहली, रोहित शर्मा(कर्णधार), श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर आणि मोहम्मद सिराज.

हायव्होलटेज सामन्यात कोण बाजी मारणार ?

आशिया कप सुपर 4 फेरीत टीम इंडियाचा हा पहिलाच सामना असेल. तर पाकिस्तानचा दुसरा सामना असेल. साखळी फेरीतील सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्याआधी 2022 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आले होते, ज्यामध्ये टीम इंडियानं बाजी मारली होती.  

भारतात कधी पाहता येणार IND vs PAK हायव्होलटेज सामना?

टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात खेळवण्यात येणारा महामुकाबला भारतात स्टार स्पोर्ट्समार्फत टीव्हीवर लाईव्ह दाखवण्यात येणार आहे. 

लाईव्ह स्ट्रीम फ्रीमध्ये कुठे पाहता येणार?

टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील हा हायव्होलटेज सामना डिस्ने प्लस हॉटस्टारवर विनामूल्य थेट प्रसारित केला जाईल. मात्र, मोफत लाईव्ह स्ट्रिमिंग सुविधा केवळ मोबाईल युजर्ससाठी असेल.

आशिया कपसाठी टीम इंडियाचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, इशान किशन, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्ण.

राखीव खेळाडू : संजू सॅमसन

आशिया कपसाठी पाकिस्तानचा संघ 
फखर जमां, इमाम उल हक, बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अशरफ, मोहम्मद हारिस, मोहम्मद वसीम जुनिअर, अब्दुल्ला शफीक, उसामा मीर, सऊद शकील, मोहम्मद नवाज, शाहीन अफरीदी, नसीम शाह, हारिस रौफ.

साखळी फेरीतील सामन्याचा लेखाजोखा 

शनिवारी, दोन सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण पाकिस्तानच्या वेगवान तिकडीसमोर भारताच्या फलंदाजांची भंबेरी उडाली होती. भारताची आघाडीची फळी 15 षटकांच्या आत तंबूत परतली होती. एकवेळ भारताची अवस्था 4 बाद 66 अशी दयनीय झाली होती. रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल स्वस्तात माघारी परतले होते. भारतीय संघ 150 धावांपर्यंत पोहचणार का ? अशी स्थिती निर्माण झाली होती. पण इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांनी जिगरबाज खेळी करत भारताचा डाव सावरला होता. हार्दिक पांड्याने 87 धावांची झुंजार खेळी केली होती. तर इशान किशन याने 82 धावांचे वादळी योगदान दिले होते. हार्दिक पांड्या आणि इशान किशन या जोडीने पाचव्या विकेटला 138 धावांची भागिदारी केली. हार्दिक आणि इशान या जोडीच्या बळावर भारतीय संघाने 266 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. पण त्यानंतर पावसाने खोडा घातल्यामुळे सामना रद्द करावा लागला होता. आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. पाकिस्तानच्या वेगवान माऱ्याला भारतीय फलंदाज कसे तोंड देणार? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ आणि नसीम शाह या वेगवान तिकडीने पहिल्या सामन्यात भारताचा संपूर्ण संघ तंबूत धाडला होता. आता 10 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागलेय. 

[ad_2]

Related posts