Daam Malware Can Stealone Personal Data From Android Mobiles Cert-in Usesrs Advisary Caring About The Mobiles Tech News Marathi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Daam Malware : इंडियन नॅशनल सायबर सिक्युरिटी एजन्सी (Indian National Security Agency) नं अँड्रॉइड मालवेअर विरुद्ध एक अॅडव्हायजरी जारी केली आहे. ज्याला एजन्सीनं Daam म्हणून आयडेंटिफाय केलं आहे. CERT-IN नं सांगितलं की, हा मालवेअर (Malware) स्मार्टफोनची सिक्युरिटी चेक बायपास करून लोकांचा गोपनीय डेटा इत्यादी चोरत आहे. तसेच, हा मालवेअर अँड्रॉइड फोनमध्ये रॅन्समवेअर इन्स्टॉल करत असल्याचंही सायबर सिक्युरिटी एजन्सीनं सांगितलं आहे. हा मालवेअर थर्ड पार्टी वेबसाईट्स आणि APK अॅप्सद्वारे लोकांच्या डिव्हाइसवर पोहोचवला जात आहे. 

एकदा का हा मालवेअर अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये आला की, हा फोनमधील सिक्युरिटी चेक अगदी सहज बायपास करू शकतो आणि फोनमधील गोपनिय माहिती तसेच, फोनमधील एक्सेस चोरतो. यामार्फत मालवेअर मोबाइल हिस्ट्री, बुकमार्क्स, कॉल लॉगमधील सगळी माहिती स्वतःकडे घेतो. एवढंच नाहीतर हा मालवेअर कॉल्स रेकॉर्डिंग, कॉन्टॅक्ट लिस्ट हॅक करणं, कॅमेऱ्याचा अॅक्सेस, सेव्ह पासवर्ड्स मॉडिफाय करणं, स्क्रिनशॉर्ट कॅप्चर, एसएमएसची चोरी, फाईल डाऊनलोड/अपलोड इत्यादी हॅक करणं आणि व्यक्तिच्या डिव्हाईसवरुन डेटा C2 सर्व्हरवर ट्रान्समिट करण्यासही सक्षम आहे. 

कशी घ्याल स्वतःच्या अँड्रॉइड फोनची काळजी? 

CERT-IN नं या मालवेअरपासून बचावासाठी काही टिप्स शेअर केल्या आहेत. एजन्सीनं अँड्रॉइड युजर्सना सांगितलं आहे की, नेहमी अॅप्स डाऊनलोड करताना काळजी घ्या आणि थर्ड पार्टी अॅप्सपासून सावध राहा. तसेच, कोणतंही अॅप डाऊनलोड करण्यापूर्वी त्याचा रिव्ह्यू, त्यासंदर्भातील कमेंट्स नक्की वाचा. यामुळे तुम्हाला अॅपसंदर्भात माहिती मिळण्यासोबतच ते कितपत खात्रीशीर आहे, याची माहिती मिळेल. त्यासोबतच तुमच्या गरजेनुसारच अॅप्सना परवानग्या द्या आणि अनट्रस्टेड वेबसाईट किंवा सोर्सेसना एक्सेस देणं टाळा. 

CERT-INनं असं देखील सांगितलं आहे की, कोणतीही वेबसाईट किंवा लिंकवर क्लिक करण्यापूर्वी तिचं डोमेन नेम नक्की चेक करा. जर डोमेन नेम मिसिंग असेल, तर लिंकवर क्लिक करु नका. युजर्सना bit.ly आणि Tinyurl यांसारख्या शॉर्ट URL पासून सावध राहायची गरज आहे. अशावेळी Malware चा सर्वात जास्त धोका असतो. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Google Malware App : फोनमधील ‘हे’ तीन धोकादायक अॅप्स तातडीने डिलीट करा

[ad_2]

Related posts