[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Man of the Match winners in IPL finals : अहमदाबादमध्ये आज आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा विजेता मिळणार आहे. हार्दिक पांड्याचा गुजरात आणि धोनीची चेन्नई एकमेंकासमोर उभा ठाकतील. हार्दिक पांड्या दुसऱ्या विजेतापदासाठी तर धोनी पाचव्या जेतेपदासाठी मैदानात उतरले. आतापर्यंतच्या 15 आयपीएलमध्ये मुंबईने पाच तर चेन्नईने चार वेळा विजय मिळवला आहे. पण आयपीएल फायनलमध्ये आतापर्यंत कोण कोण सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरलेय.. याबाबत तुम्हाला माहित आहे का ? विशेष म्हणजे, आतापर्यंत कोणत्याही खेळाडूला आयपीएल फायनलमध्ये दोन वेळा सामनावीर पुरस्कार मिळाला नाही. 15 आयपीएल फायनलमध्ये 15 जणांनी सामनावीर पुरस्कारावर नाव कोरलेय.
पहिला सामनावीर पुरस्कार कुणी पटकावला ?
आयपीएलचा पहिला सामनावीर पुरस्कार युसूफ पठाण याने पटकावला आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामात 2008 मध्ये राजस्थान आणि चेन्नई यांच्यात फायनलची लढथ झाली होती. या सामन्यात राजस्थानच्या युसूफ पठाण याने अष्टपैलू खेळी केली होती. युसूफ पठाण याने फलंदाजी 56 धावांचे योगदान दिले होते. तर गोलंदाजीत तीन विकेट घेण्याचा पराक्रम केला होता. युसूफ पठाण याच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने पहिल्या आयपीएल चषकावर नाव कोरले होते.
Man of the Match winners in IPL finals
वर्ष | आयपीएल फायनल | सामनावीर Man of the Match |
2008 | राजस्थान रॉयल्स vs चेन्नई सुपर किंग्स | युसूफ पठाण (RR) – 56 (39), 3/22 |
2009 | डेक्कन चार्जस vs आरसीबी | अनिल कुंबळे (RCB) – 4/16 |
2010 | चेन्नई सुपर किंग्स vs मुंबई इंडियन्स | सुरेश रैना (CSK) – 57* (35), 1/21 |
2011 | चेन्नई सुपर किंग्स vs आरसीबी | मुरली विजय (CSK) – 95 (52) |
2012 | केकेआर vs चेन्नई सुपर किंग्स | मनविंदर बिसला (KKR) – 89 (48) |
2013 | मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्स | कायरन पोलार्ड (MI) – 60* (32) |
2014 | केकेआर vs पंजाब किंग्स | मनिष पांडे (KKR) – 94 (50) |
2015 | मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्स | रोहित शर्मा (MI) – 50 (26) |
2016 | सनरायजर्स हैदराबाद vs आरसीबी | बेन कटिंग (SRH) – 39* (15) |
2017 | मुंबई इंडियन्स vs रायझिंग पुणे सुपरजायंट्स | कृणाल पांड्या (MI) – 47 (38) |
2018 | चेन्नई सुपर किंग्स vs सनरायजर्स हैदराबाद | शेन वॉटसन (CSK) – 117* (57) |
2019 | मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्स | जसप्रीत बुमराह (MI) – 2/14 |
2020 | मुंबई इंडियन्स vs दिल्ली कॅपिटल्स | ट्रेंट बोल्ट (MI) – 3/30 |
2021 | चेन्नई सुपर किंग्स vs केकेआर | फाफ डु प्लेसिस (CSK) – 86 (59) |
2022 | गुजरात टायटन्स vs राजस्थान रॉयल्स | हार्दिक पांड्या (GT) – 34 (30), 3/17 |
2023* | चेन्नई सुपर किंग्स vs गुजरात टायटन्स | TBD |
आणखी वाचा :
15 आयपीएल फायनलमधील आकडेवारी एका क्लिकवर, पाहा सविस्तर
[ad_2]