World Cup 2023 Virat Kohli Play Fourth World Cup Of His Career Latest Marathi News Update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Virat Kohli In World Cup : विश्वचषकाला अवघे पाच दिवस शिल्लक आहेत. यजमान भारतीय संघाने विजयासाठी कंबर कसली आहे. भारतीय संघ 8 ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या अभियानाची सुरुवात करणार आहे. भारतीय संघात यंदा रोहित, विराटसारख्या दिग्गजांचा भरणा आहे. 2011 चा विश्वचषक खेळणारे विराट आणि अश्विन हे दोन खेळाडू आहेत. पण यंदाच्या विश्वचषकात भारताचा सर्वात अनुभवी खेळाडू विराट कोहली आहे. होय, ऑस्ट्रेलियाविरोधात टीम इंडिया मैदानात उतरताच विराट कोहली मोठा विक्रम नावावर करणार आहे. विराट कोहली भारतासाठी चौथा विश्वचषक खेळण्यासाठी मैदानात उतरत आहे. संघातील इतर कोणत्याही खेळाडूने सलग चार विश्वचषक खेळले नाहीत.

चेसमास्टर, रनमशीन, किंग यासारख्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीचा यंदाचा चौथा विश्वचषक आहे. याआधी विराट कोहलीने 2011, 2015, 2019 या तीन विश्वचषकात विराट भारतीय संघाचा भाग होता. रोहित शर्मा 2015 आणि 2019, अश्विन 2011 आणि 2015 विश्वचषकात भारतीय संघाचा भाग होता. मोहम्मद शामी 2015 आणि 2019 विश्वचषकात टीम इंडियाचा सदस्य होता. आता विराट कोहलीचा चौथा विश्वचषक आहे.  भारतासाठी चार विश्वचषक खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचा समावेश होईल. याआधी  कपिल देव, सुनील गावसकर, अनिल कुंबळे, एमएस धोनी यासारख्या दिग्गजांनी भारतासाठी चार विश्वचषक खेळले आहेत. या यादीत आता किंग कोहलीचा समावेश होईल.

सर्वाधिक विश्वचषक खेळणाऱ्या भारतीय खेळाडूमध्ये सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानावर आहे. 1992 ते 2011 यादरम्यान 24 वर्षांत सचिन तेंडुलकर याने सहा विश्वषकात सहभाग घेतला आहे. सचिनशिवाय पाकिस्तानच्या जावेद मियांदाद यांनीही सहा विश्वचषकात सहाभाग घेतलाय. तर पाच विश्वचषक खेळणाऱ्या खेळाडूमध्ये रिकी पाँटिंग, माहेला जयवर्धने, जॅक कॅलिस यासह इतर  खेळाडूंचा समावेश आहे. 

अवघ्या 22 व्या वर्षी विश्वचषकात पदार्पण – 

विराट कोहलीने अवघ्या 22 व्या वर्षात विश्वचषकात सहभाग घेतला होता. 2011 वर्ल्डकपवेळी विराट कोहलीचे वय 22 इतके होते. बांगलादेशविरोधात विराट कोहलीने शतकी खेळी करत क्रीडा जगताला चुणूक दाखवली होती. तीन विश्वचषकात विराट कोहलीने भारतासाठी एक हजारपेक्षा जास्त धावा चोपल्या आहेत. 

सचिनचा विक्रम विराट मोडणार – 

रनमशिन विराट कोहली सध्या जगातील आघाडीच्या फलंदाजापैकी एक आहे. विराट कोहलीने आतापर्यंत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. यंदाच्या विश्वचषकात विराट कोहली सचिनच्या शतकांच्या विक्रम मोडण्याची शक्यता आहे. वनडे क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या नावावर सध्या 47 शतकांची नोंद आहे. सचिनच्या सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडण्यासाठी विराट कोहलीला फक्त 3 शतकांची गरज आहे. सचिन तेंडुलकरच्या नावावर वनडेमध्ये 49 शतकांची नोंद आहे.

[ad_2]

Related posts