Cricket Players Who Have Played World Cup For 2 Countries Latest Marathi News Update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Cricket World Cup history : आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडू विश्वचषकात (ICC World Cup) खेळण्याचे स्वप्न पाहतो. काहींचे हे स्वप्न पूर्ण होते, तर काहींचं नाही. पण  क्रिकेट (Cricket) विश्वातील चार खेळाडूंनी दोन देशांकडून विश्वचषक खेळण्याचा पराक्रम केला आहे. अनेक खेळाडूंनी दोन देशांकडून क्रिकेट खेळले आहे, पण विश्वचषकात दोन देशाचे प्रतिनिधित्व करणं, मोठी गोष्ट आहे. चार खेळाडूंनी दोन देशाकडून विश्वचषक (ICC World Cup) खेळण्याची किमया साधली आहे. यामध्ये एका खेळाडूने तर विश्वचषकावर नाव कोरले आहे. पाहूयात त्या चार खेळाडूंबद्दल… 
 
केप्लर वैसल्स  (Kepler Wessels) – 

दोन देशांकडून विश्वचषक खेळणारा पहिला खेळाडू केप्लर वैसल्स (Kepler Wessels) हा आहे. केप्लर वैसल्स याने 1983 मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाकडून विश्वचषक खेळला. त्यानंतर ऑस्ट्रेलियापासून फारकत घेत केप्लर वैसल्स याने दक्षिण आफ्रिका संघाची वाट धरली. 1992 विश्वचषकात केप्लर वैसल्स याने दक्षिण आफ्रिका संघाचे प्रतिनिधित्व केले. 1992 विश्वचषकात केप्लर वैसल्स दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार होता. केप्लर वैसल्सच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिका संघाने सेमीफायनलपर्यंत धडक मारली होती. 

इयोन मोर्गन (Eoin Morgan) –

इयोन मोर्गन (Eoin Morgan) याने 2019 च्या विश्वचषकात इंग्लंडसाठी मोठी जबाबदारी पार पाडली होती. इंग्लंडच्या विश्वचषक विजयात इयोन मोर्गन (Eoin Morgan) इंग्लंड संघाचा कर्णधार होता. पण इंग्लंडआधी इयोन मोर्गन आयर्लंड संघाचा भाग होता. 2007 च्या विश्वचषकात इयोन मोर्गन (Eoin Morgan) आयर्लंड संघाचा सदस्य होता. त्यानंतर तो इंग्लंड संघात सहभागी झाला. मॉर्गन याने इंग्लंडसाठी 2011, 2015 आणि 2019 च्या विश्वचषकात भाग घेतला. इयोन मोर्गन (Eoin Morgan) याच्या नेतृत्वात इंग्लंडने 2019 च्या विश्वचषकावर नाव कोरले. 
 
एड जॉयस (Ed Joyce)

एड जॉयस (Ed Joyce) याने आपल्या क्रिकेटची सुरुवात इंग्लंड संघातून झाली होती. 2007 विश्वचषकात जॉयस इंग्लंडच्या संघाचा सदस्य होता. पण त्यानंतर एड जॉयस (Ed Joyce) याने आयर्लंड संघाचा रस्ता धरला. 2011 आणि 2015 च्या विश्वचषकात एड जॉयस (Ed Joyce) आयर्लंड संघाचा सदस्य होता. 

अँडरसन कमिन्स (Anderson Cummins) –

अँडरसन कमिन्स (Anderson Cummins) याच्या दोन विश्वचषक खेळण्यातील अंतर 15 वर्ष इतके होते. अँडरसन कमिन्स (Anderson Cummins) याने 1992 मध्ये वेस्ट इंडिज संघाकडून विश्वचषकात भाग घेतला होता. त्यावेळी भारताविरोधात त्याने दमदार कामगिरी केली होती. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. 2007 च्या विश्वचषकात अँडरसन कमिन्स (Anderson Cummins) कॅनडा संघाचा सदस्य होता. त्यावेळी त्याचे वय 41 वर्ष इतके होते. अँडरसन कमिन्स (Anderson Cummins) याने कॅनडासाठी तीन सामन्यात दोन विकेट घेतल्या आहेत.  

[ad_2]

Related posts