Asian Games 2023 India Vs Nepal Live Score India Post 202 In 20 Overs Against Nepal In The Quarter Finals Of Asian Games

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Asian Games 2023 India vs Nepal Live Score : यशस्वी जायस्वालचे वादळी शतक आणि रिंकू-दुबेच्या फिनिशिंग टचच्या जोरावर भारताने निर्धारित 20 षटकांत 4 विकेटच्या मोबदल्यात 202 धावांपर्यंत मजल मारली. यशस्वी जायस्वाल याने 7 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने शतक झळकावले. तर अखेरच्या षटकात शिवम दुबे आणि रिंकू सिंह यांनी 22 चेंडूत 52 धावांची भागिदारी केली. नेपाळला विजयासाठी 203 धावांचे आव्हान देण्यात आले आहे.

यशस्वीचा शतकी तडाखा –

भारताचा युवा फलंदाज यशस्वी जायस्वाल याने वादळी फलंदाजी करत शतक ठोकले. आशियाई क्रीडा स्पर्धेत यशस्वी जायस्वाल याने शतक ठोकले आहे. असा पराक्रम करणारा यशस्वी पहिला भारतीय फलंदाज ठरलाय. गोलंदाजाला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर यशस्वीने धावांचा पाऊस पाडला. यशस्वी जायस्वाल याने 49 चेंडूत शतक ठोकले. या शतकी खेळीमध्ये त्याने सात षटकार आणि आठ चौकार ठोकले. यशस्वी जायस्वाल याने ऋतुराजसोबत शतकी खेळी केली, त्यानंतर भारताची धावसंख्या वेगाने वाढवली.  

दुबे-रिंकूचा फिनिशिंग टच –

रिंकू सिंह आणि शिवब दुबे यांनी अखेरच्या षटकार वादळी फलंदाजी केली. दोघांनी चौकार षटकारांचा पाऊस पाडला. 22 चेंडूत 52 धावांची भागिदारी केली. रिंकू सिंह याने 15 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 37 धावा चोपल्या. तर शिवब दुबे याने 19 चेंडूत एक षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने 25 धावा केल्या.

भारताची दमदार सुरुवात – 

आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष क्रिकेट प्रकारात भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये उप उपांत्य फेरीचा सामना सुरु आहे. भारताचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जायस्वाल यांनी भारताला दमदार सुरुवात करुन दिली. कर्णधार ऋतुराज गायकवाड याने संयमी फलंदाजी केली, पण दुसऱ्या बाजूला यशस्वी जायस्वालने रौद्ररुप धारण केले होते. यशस्वी जायस्वाल याने षटकारांची बरसात केली. ऋतुराज आणि यशस्वी जायस्वाल यांनी शतकी सलामी दिली. अवघ्या 9 षटकात दोघांनी भारताचे शतक फलकावर लावले होते. यामध्ये ऋतुराज गायकवाड याने अवघ्या 22 चेंडूत पाच षटकारांच्या मदतीने अर्धशतक ठोकले होते. ऋतुराज गायकवाड याला मोठी खेळी करता आली नाही. ऋतुराज गायकवाड 23 चेंडूत 25 धावांवर बाद झाला. ऋतुराज गायकवाड याने या खेळीत 4 चौकार ठोकले. 

भारताची फलंदाजी ढेपाळली – 

यशस्वी जायस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी वादळी सुरुवात केली. पण 103 धावांवर भारताला पहिला धक्का बसला. त्यानंतर भारताच्या फलंदाजांनी हराकिरी केली. एकापाठोपाठ एक विकेट फेकल्या. तिलक वर्मा आणि जितेश शर्मा यांना मोठी खेळी करता आली नाही. जितेश शर्मा अवघ्या पाच धावांवर तंबूत परतला.तर तिलक वर्मा याने दहा चेंडूत फक्त दोन धावा केल्या. 

 

[ad_2]

Related posts