[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
नवी दिल्ली : विशेष करून वर्ल्डकपच्या मैदानात (ICC Cricket World Cup 2023) कायमच कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेने (South Africa) आज (7 ऑक्टोबर) मात्र वर्ल्डकपमध्ये दमदार अशी सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेने अगदी भिमराक्रम करताना वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या रचत इतिहास रचला आहे. श्रीलंकेविरुद्ध नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर पहिल्यांदा फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 50 षटकात तब्बल 428 धावा ठोकल्या. यामध्ये आफ्रिकेकडून दमदार तीन शतकांची नोंद झाली. सलामीवीर क्विंटन डिकाॅक 100 धावांवर बाद झाला.
तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या वॅन देर दुसेननं 108 धावांची खेळी केली. मधल्या फळीत आलेल्या एडन मार्करमने (Aiden Markram) तर तुफानी फटकेबाजी करत अवघ्या 54 चेंडूत 106 धावांची खेळी साकारली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला 50 षटकात पाच बाद 428 धावांचा डोंगर उभा करता आला. कॅप्टन बवुमा स्वस्तात बाद झाल्याचा दक्षिण आफ्रिकेवरती कोणताही परिणाम झाला नाही. या धावसंख्ये नंतर दक्षिण आफ्रिकेचे अनेक पराक्रम रचले गेले आहेत.
विक्रमांचा रतीब
यामध्ये हा दक्षिण आफ्रिकेची सर्वाधिक धावसंख्या वर्ल्डकपमधील ठरली आहे. आतापर्यंत 400 च्यावर धावसंख्या वर्ल्डकपमध्ये ठोकण्यात दक्षिण आफ्रिकेला तब्बल तीनवेळा यश आलं आहे. हीच कामगिरी टीम इंडियाला अवघ्या एकवेळा करता आली आहे, तर ऑस्ट्रेलियाला सुद्धा एकवेळा करता आली आहे. याव्यतिरिक्त कोणत्याही संघाला ही कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे एकंदरीत दक्षिण आफ्रिकेची आजची खेळी अविस्मरणीय अशीच झाली आहे.
- वर्ल्ड कपमध्ये सर्वात वेगवान शतक.
- वर्ल्ड कपमध्ये एकाच डावात 3 शतके करणारा पहिला संघ.
- वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या.
- वर्ल्ड कपमध्ये 200 वे वैयक्तिक शतकवर्ल्ड कपमध्ये
- वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक वेळा 400+
दक्षिण आफ्रिकेनं नोंदवलेली धावसंख्या सर्वोच्च ठरलीच, पण वर्ल्डकपमधील सर्वात वेगवान शकत मार्करमचे ठरले. त्यामुळे एकंदरीत तीन शतकांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने उभा केलेली 428 धावांची खेळी अनेक विक्रमांची रतीब घालणारी ठरली आहे.
History of 48 years and 450 matches of the ICC Cricket World Cup.
Aiden Markram with the fastest century and South Africa with the highest total in the same match today. pic.twitter.com/dCy9dAP9Ah
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 7, 2023
वर्ल्डकपमध्ये 48 वर्ष आणि तब्बल 450 सामन्यात जो पराक्रम घडला नाही तो घडला
मार्करमने केलेल्या खेळीने अनेक विक्रम मोडित निघाले आहेत. वर्ल्डकपमध्ये 48 वर्ष आणि 450 सामन्यात जो पराक्रम घडला नाही तो घडला आहे. आज याच सामन्यात सर्वात वेगवान शतक आणि सर्वाधिक धावसंख्येची आफ्रिकेकडून नोंद झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
[ad_2]