Mitchell Starc Fastest To 50 World Cup Wickets Lasith Malinga Ind Vs Aus Latest Sports New

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Fastest To 50 World Cup Wickets  : भारतात होणाऱ्या विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाचा रनसंग्राम सुरु झाला. या विश्वचषकात अनेक विक्रम मोडीत निघत आहेत. आजही भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्यात अनेक विक्रम झाले आहेत. मिचेल स्टार्क याने विश्वचषकात 50 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. विश्वचषकात सर्वात वेगवान 50 विकेट घेण्याचा पराक्रम स्टार्कने केला आहे.  दरम्यान, विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या पाच गोलंदाजांमध्ये एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. भारताकडून  विश्वचषकात सर्वाधिक विकेट झहीर खान याने घेतल्या आहेत. 

मिचेल स्टार्कच्या नावावर विक्रम 

मिचेल स्टार्कने विश्वछचषकात सर्वात वेगवान 50 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. स्टार्कने 941 चेंडूमध्ये 50 विकेटचा टप्पा पार केला आहे. याआधी लसीथ मलिंगा याने सर्वात वेगवान 50 विकेट घेतल्या होत्या. मलिंगाला 50 विकेटसाठी 1187 चेंडू फेकावे लागले होते. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज ग्लेन मॅक्ग्राथ याने 1540 टचेंडूमध्ये 50 विकेट घेतल्या होत्या.  

विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज – 

वनडे वर्ल्ड कप इतिहासात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्ग्राथच्या नावावर आहे. त्याने 71 विकेट घेतल्या आहेत. जगातील घातक गोलंदाजामध्ये ग्लेन मॅक्ग्राथ याचे नाव आघाडीवर आहे. ग्लेन मॅक्ग्राथ याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा फिरकीपटू मुथया मुरलीधऱन याचा क्रमांक लागतो. मुरलीधरन याने 40 सामन्यात 68 विकेट घेतल्या आहेत. श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाचाही या यादीत समावेश आहे. मलिंगाच्या यॉर्करपुढे अनेकजणांनी गुडघे टेकले. मलिंगाने 29 सामन्यात 56 विकेट घेतल्या. 38 धावांच्या मोबदल्यात सहा विकेट ही मलिंगाची सर्वोत्तम कामगिरी होय. पाकिस्तानच्या वसीम आक्रमचा चौथा क्रमांक लागतो. वसीम अक्रमने 38 सामन्यात 55 विकेट घेतल्यात. तर स्टार्कने 50 विकेट घेत पाचवे स्थान काबिज केलेय. यंदाच्या विश्वचषकात स्टार्क लसिथ मलिंगा आणि वसीम आक्रम यांचा विक्रम मोडू शकतो.  

भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारे पाच गोलंदाज-

1. झहीर खान (Zaheer khan) :

विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजामध्ये झहीर खान पहिल्या स्थानावर आहे. 2011 च्या विश्वचषक विजयात झहीर खान याचा सिंहाचा वाटा होता. आयसीसीच्या महाकुंभामध्ये झहीर खान याने 23 सामन्यात 4.47 इकॉनॉमिनीने 44 विकेट घेतल्यात. झहीर खान याने विश्वचषकात 12 षटके निर्धाव फेकली अन् एक वेळा चार विकेट घेतल्या. 

 2. जवागल श्रीनाथ (Javagal Srinath) : 

भारतीय संघाचा आघाडीचा माजी गोलंदाज जवागल श्रीनाथने विश्वचषकाच्या 34 सामन्यात प्रतिनिधित्व केलेय.  जवागल श्रीनाथने 34 सामन्यात 44 विकेट घेतल्या आहेत. श्रीनाथने विश्वचषकात दोन वेळा चार विकेट घेतल्या आहेत. जवागल श्रीनाथने विश्वचषकात 21 षटके निर्धाव फेकली आहेत.

3. मोहम्मद शमी (Mohammed Shami) :

मोहम्मद शामीने विश्वचषकाच्या 11 सामन्यात  31 विकेट घेण्याचा भीमपराक्रम केला आहे. शामीने एक वेळा पाच आणि तीन वेळा चार विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. यंदाच्या विश्वचषकातही मोहम्मद शामीकडून दमदार कामगिरीची आपेक्षा असेल. अनुभवी मोहम्मद शामी भारतासाठी एक्स फॅक्टर ठरू शकतो. 

4. अनिल कुंबले (Anil Kumble) :

अनिल कुंबळे याने विश्वचषकात भारतासाठी 18 सामने खेळले आहेत. या 18 सामन्यात 4.08 च्या अकॉनॉमीने 31 विकेट घेतल्या आहेत. 

5. कपिल देव (Kapil Dev) : 

कपिल देव यांनी विश्वचषकाच्या 26 सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेय. कपिल देव यांनी 26 सामन्यात 28 विकेट घेतल्या आहेत. एकाच सामन्यात पाच विकेट घेण्याचा पराक्रमही कपिल देव यांच्या नावावर आहे. विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजामध्ये कपिल देव पाचव्या क्रमांकावर आहेत.

[ad_2]

Related posts