[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
नागपूर : आयपीएलच्या फायनलनंतरही क्रिकेटचा फिवर देशभरात सूरू आहे. गल्लोगली मैदानावर तरुण मंडळी क्रिकेट खेळण्यात व्यस्त आहेत. दुसरीकडे आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाइन सट्टेबाजी जोरात सुरू होती. इंडियन प्रीमियर लीगमधील अंतिम चेन्नई सुपर किंग विरुद्ध गुजरात टायटन्स या संघाच्या अंतिम क्रिकेट सामन्यावर काही जण सट्टा खेळत असल्याची माहिती पथकाला मिळाली.या माहितीच्या आधारे आयपीएल फायनलवर सट्टा लावणाऱ्या दोन बुकींना अटक करण्यात सोनेगाव पोलिसांना यश आले आहे. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करत पोलिसांनी दोघांनाही नागपूर विमानतळावरून अटक केली. हे दोन्ही बुकी गोव्याहून नागपूरला पोहोचले होते. कुमार हरी कुमार सचदेव, (रा. जरीपटका) आणि हेमंत राजकुमार गुरुशग्यानी, (रा. शारदा कंपनी चौक, कामठी रोड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
आयपीएल सामन्यांवर सट्टेबाजी करणाऱ्या दोन बुकी गोव्यातून नागपुरात येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या वृत्ताला दुजोरा मिळाल्यानंतर पोलिसांनी विमानतळावर सापळा रचला. दोघेही विमानतळाबाहेर येताच पोलिसांनी त्यांना पकडले. यानंतर दोघांना सोनेगाव पोलिस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी आरोपींकडून एक लॅपटॉप, तीन मोबाईल, रोख असा तीन लाखांचा माल जप्त करण्यात आला. पोलिस या दोघांची सतत चौकशी करत आहेत.

या आरोपींनी आयपीएल क्रिकेट सामन्यांवर बेकायदेशीर सट्टा लावून आणि बेहिशेबी आर्थिक व्यवहार करून सरकारची फसवणूक केली. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून महाराष्ट्रासह राज्याबाहेरील बुकींची साखळी असण्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली असून त्यानुसार तपास सुरू आहे.
[ad_2]