[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
World Cup 2023 India Vs Bangladesh : रोहित शर्मा अॅण्ड कंपनीने लागोपाठ तीन सामने जिंकत विश्वचषकाची सुरुवात दणक्यात केली आहे. भारताचा पुढील सामना बांगलादेशविरोधात होणार आहे. 19 ऑक्टोबर रोजी पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या मैदानावर भारत आणि बांगलादेश यांच्यातील लढत होणार आहे. भारतीय संघ पुण्यात दाखल झाला असून सरावही केला आहे. वनडे क्रिकेटमध्ये बांगलादेशविरोधात भारताचा रेकॉर्ड चांगला आहे. आकडे पाहिल्यास भारताचे पारडे जड दिसतेय. विराट कोहलीने बांगलादेशची गोलंदाजी फोडून काढली आहे. गुरुवारी होणाऱ्या सामन्यातही विराट कोहली धावांचा पाऊस पाडू शकतो.
बांगलादेशविरोधात कोहलीने धावांचा पाऊस पाडला आहे. विराट कोहलीने 15 वनडे साममन्यात 807 धावा चोपल्या आहेत. यादरम्यान त्याने 4 शतके आणि 3 अर्धशतके ठोकली आहेत. बांगलादेशविरोधात विराट कोहलीची सर्वोत्तम धावसंख्या 136 इतकी आहे. बांगलादेशविरोधात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजामध्ये रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने 16 सामन्यात 738 धावा केल्या आहेत. यामध्ये तीन शतके आणि तीन अर्धशतके ठोकली आहेत. बांगलादेशविरोधात रोहित शर्माची सर्वोच्चम धावसंख्या 137 इतकी आहे.
बांगलादेशची गोलंदाजी फोडून काढणाऱ्या भारतीय फलंदाजामध्ये ईशान किशन तिसऱ्या क्रमांकावर आहे. ईशान किशन यान दोन सामन्यात बांगलादेशची गोलंदाजी फोडून काढली आहे. ईशान किशन याने बांगलादेशची गोलंदाजी फोडून काढत द्विशतक ठोकले होते. ईशान किशन याने दोन सामन्यात 215 धावा चोपल्या आहेत. यामध्ये 210 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. चौथ्या क्रमांकावर केएल राहुल आहे. राहुलने 5 वनडे सामन्यात 191 धावा चोपल्या आहेत.
बांगलादेशविरोधात अजित अगरकर याने सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. अजित अगरकर याने आठ सामन्यात 16 विकेट घेतल्या आहेत. रविंद्र जाडेजा दुसऱ्या क्रमांकावर आहे. जाडेजाने बांगलादेशच्या 12 फलंदाजांना तंबूत धाडले आहेत. जसप्रीत बुमराह तिसऱ्या क्रमांकावर आहे. बुमराहने 4 सामन्यात दहा विकेट घेतल्या आहेत. गुरुवारी बांगलादेशविरोधात होणाऱ्या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जाडेजा भारतासाठी एक्स फॅक्टर ठरु शकतात.
टीम इंडियाची सुरुवात भन्नाट, सेमीफायनलच्या दिशेने टाकले पाऊल –
टीम इंडियाने सुरुवातीच्या तिन्ही सामन्यात विजय मिळवून सेमीफायनलच्या दिशेन पाऊल टाकले आहे. भारताने तीनपैकी दोन सामन्यात बलाढ्य संघाचा पराभव केला आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला सहा विकेटने हरवले. त्यानंतर पाकिस्तान संघाचा सात विकेटने पराभव केला. तर अफगाणिस्तानविरोधातही विजय मिळवत भारताने आपली दावेदारी मजबूत केली आहे.
आणखी वाचा :
World Cup 2023 Semi Final : रोहित सेनेला सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी हे सामने जिंकावेच लागतील, पाहा समीकरण
[ad_2]