IND Vs BAN Match Pune Weather Forecast India Vs Bangaladesh ICC ODI World Cup 2023 Latest Sports Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

India vs Bangaladesh Match Weather Forecast : विश्वचषक 2023 (World Cup 2023) मध्ये आज यजमान भारताचा मुकाबला बांगलादेश (IND va BAN) संघासोबत होणार आहे. दुपारी 1.30 वाजता नाणेफेक (Toss) होईल, त्यानंतर दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होईल. पुण्यातील (Pune) महाराष्ट्र क्रिकेट असोसिअशन स्टेडिअम (Maharashtra Cricket Association Stadium) मध्ये या सामन्याचा थरार पाहायला मिळणार आहे. दरम्यान, आजच्या सामन्यावर पावसाचं सावट (Today Rain Prediction) आहे का आणि आज पुण्यातील हवामान (Weather Forecast) कसं असेल जाणून घ्या.

IND va BAN, Weather Forecast : भारत-बांगलादेश सामन्यावेळी हवामान कसं असेल?

क्रिकेट चाहत्यांसाठी (Cricket Fans) एक चांगली बातमी आहे, ती म्हणजे आज पुण्यामध्ये हवामान (Pune Today Weather Update) स्वच्छ असेल. वर्ल्ड कप 2023 मधील आजच्या भारत विरुद्ध बांगलादेश (IND va BAN, Weather Report) सामन्यावर पावसाचं सावट नाही. भारत-बांगलादेश सामन्याच्या दिवशी पुण्यात सूर्यप्रकाश असेल. ताशी 2-10 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. मात्र, पावसाची शक्यता नाही. मात्र, क्रिकेट चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. भारत-बांगलादेश सामन्याच्या दिवशी पुण्यात पाऊस पडू शकतो, असे मानले जात होते, मात्र हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार गुरुवारी पुण्यात पाऊस पडण्याची शक्यता नाही.

दोन्ही संघांची वाटचाल

भारताने यंदाच्या विश्वचषकात सलग तीन विजय मिळवले आहे. सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया धूळ चारत नंतर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. बांगलादेशने अफगाणिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला, पण इंग्लंडविरुद्ध 137 धावांनी पराभव पत्करावा लागला. यानंतर न्यूझीलंडने बांगलादेशचा आठ गडी राखून पराभव केला.

टीम इंडियाची पॉइंट टेबलमधील स्थिती काय?

विश्वचषक 2023 स्पर्धेत भारताने विजयाची हॅटट्रिक केली आहे. सलग चौथा विजय नोंदवण्याच्या इराद्याने टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध मैदानात उतरणार आहे.  त्याचबरोबर भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध विजय मिळवण्यात यशस्वी ठरला तर गुणतालिकेत अव्वल स्थान गाठण्याची संधी असेल. सध्या भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. टीम इंडियाने तीन सामने खेळले असून तीनही सामने जिंकले आहेत. न्यूझीलंडचा संघ चार सामन्यांनंतर आठ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. बांगलादेशी संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे.

महत्वाच्या इतर बातम्या :

[ad_2]

Related posts