[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Jai Shree Hanuman, Keshav Maharaj : शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा अवघ्या एका विकेटने पराभव केला. चेन्नईच्या मैदानात झालेल्या अतिशय रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराज याने विजयी फटका मारत पाकिस्तानचे स्वप्न धुळीस मिळवले. पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर केशव महाराज याची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. केशव महाराज याच्या बॅटवर ‘ॐ’ लिहिलेले आहे. तो हनुमानाचा मोठा भक्त आहे. पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर केशव महाराज याने सोशल मीडियाव पोस्ट टाकली. त्यामध्ये त्याने जय श्री हनुमान असाही उल्लेख केला. क्षणभरात ही पोस्ट चर्चेत आली.
विजयानंतर काय केली पोस्ट ? –
पाकिस्तानला हरवल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा स्टार गोलंदाज केशव महाराजने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये केशव महाराज याने भगवान हनुमानाचे स्मरण करत कॅप्शनमध्ये लिहिलेय. मला देवावर विश्वास आहे, शम्सी आणि एडन मार्करामची कामगिरी पाहणे आश्चर्यकारक आहे. जय श्री हनुमान. या पोस्टनंतर केशव महाराजांचे कौतुक होत आहे.
कोण आहे केशव महाराज ?-
केशवचं भारतासोबत एक खास कनेक्शन आहे. केशव महाराज भारतीय वंशाचा आहे. केशवचे पूर्वज भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील सुलतानपूरचे होते. केशवचे वडील आत्मानंद महाराज यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितलं होतं की, त्यांचे पूर्वज 1874 च्या सुमारास सुलतानपूरहून डर्बनला आले होते. त्या काळात भारतीय लोक कामाच्या शोधात दक्षिण आफ्रिकेसारख्या देशांत स्थलांतरीत होत होते. केशव हिंदू देवी-देवतांची पुजाही करतो, विशेषत: तो हनुमानाचा मोठा भक्त आहे.
केशवचे वडीलही क्रिकेटपटू –
केशवचे वडील आत्मानंद हे देखील क्रिकेटपटू होते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी विकेटकिपरची भूमिका पार पाडली आहे. मात्र, आत्मानंद यांना कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. केशव महाराजच्या कुटुंबात एकूण 4 सदस्य आहेत. केशव व्यतिरिक्त आई-वडील आणि एक बहीण आहे. बहिणीचं लग्न श्रीलंकेत झालं आहे. केशवचे वडील आत्मानंद यांनी सांगितलं होतं की, आम्ही आमच्या कुटुंबातील पाचवी किंवा सहावी पिढी आहोत. ‘महाराज’ हे आडनाव माझ्या पूर्वजांची देण आहे. भारतात नावाचं महत्त्व काय आहे, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे.
केशव महाराजचे करिअर –
33 वर्षीय केशव महाराज याने आतापर्यंत 49 कसोटी, 37 एकदिवसीय आणि 26 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या कालावधीत केशव महाराजनं कसोटी सामन्यात 31.99 च्या सरासरीनं 158 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर या फिरकीपटूच्या नावावर एकदिवसीय सामन्यात 44 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 22 विकेट आहेत. बॅटनं आपला पराक्रम दाखवत महाराजनं कसोटी क्रिकेटमध्ये 1129 धावा आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 209 धावा केल्या आहेत.
[ad_2]