[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
IND vs ENG, World Cup 2023 : लखनौच्या इकाना स्टेडिअममध्ये गतविजेता इंग्लंड आणि भन्नाट फॉर्मात असलेला भारत यांच्यामध्ये लढत होणार आहे. गतविजेत्या इंग्लंडला पाच सामन्यात फक्त एक विजय मिळवता आलाय. चार सामन्यात पराभूत झालेल्या इंग्लंडला सेमीफायनलचे आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताविरोधात मोठा विजय मिळवावा लागेलल. पण संघाचा फॉर्म पाहता इंग्लंडचा संघ आता सेमीफायनलमध्ये पोहोचेल का याबाबत शंका आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सलग सहाव्या विजयासह सेमीफायनलमधील स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न करेल. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंडचा संघ स्पर्धेतील अस्तित्व टिकवण्यासाठी मैदानात उतरेल. भारतात सुरु असलेल्या विश्वचषकात आतापर्यंत एकही लढत पावसामुळे रद्द झाली नाही. सर्व सामन्यांचे निकाल लागलेत. आता उद्या म्हणजे 29 ऑक्टोबर रोजी लखनौ येथे होणाऱ्या लढतीत देखील पावसाची कोणतीही शक्यता नाही.
रविवारी लखनौमध्ये पावसाची शक्यता नाही –
हवामान खात्याच्या माहितीनुसार, रविवारी लखनौमध्ये तापमान 32 अंशांच्या आसपास असेल. चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे पावसाची कोणताही शक्यता नाही. याशिवाय आर्द्रता 40 टक्के राहण्याचा अंदाज आहे. रविवारी लखनऊमध्ये पाऊस पडणार नाही, ही चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. इंग्लंड आणि भारताच्या सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा बदल होणार आहे. भारतीय संघ सध्या 10 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.
भारत आणि इंग्लंडमध्ये आमनासामना –
गतविजेता इंग्लंड विश्वचषकातलं आपलं आव्हान कायम राखणार की, त्यांचं आव्हान साखळीतच संपुष्टात येणार याचा फैसला उद्या होणाराय. योगायोगाची बाब म्हणजे विश्वचषकातल्या या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडची गाठ रोहित शर्माच्या भारतीय संघाशी पडणार आहे. या दोन संघांमधला विरोधाभास म्हणजे विश्वचषकाच्या गुणतालिकेत भारत दुसऱ्या स्थानावर आहे, तर इंग्लंड शेवटून दुसऱ्या म्हणजे नवव्या स्थानावर आहे. भारतानं आतापर्यंत पाचपैकी पाचही सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडला पाचपैकी बांगलादेशविरुद्धचा केवळ एकमेव सामना जिंकता आला आहे. त्यामुळं भारताला हरवून विश्वचषकातलं आपलं आव्हान टिकवण्याचा इंग्लंडचा प्रयत्न राहिल. तर रोहित शर्माचा भारतीय संघ इंग्लंडला हरवून विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या दिशेनं आणखी एक पाऊल टाकण्याचा नेटानं प्रयत्न करेल.
गुणतालिकेतील स्थिती काय ?
जोस बटलरच्या नेतृत्वातील इंग्लंड संघाला अतापर्यंत चांगली कामगिरी करता आली नाही. गतविजेता इंग्लंड गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. इंग्लंड संघाने पाच सामन्यात फक्त दोन गुणांची कमाई केली आहे. तर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडिया भन्नाट फॉर्मात आहे. भारताने आपल्या पहिल्या पाचही सामन्यात विजय मिळवला आहे. भारतीय संघ गुणतालिकेत सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने इंग्लंडचा पराभव केल्यास अव्वल स्थानावर पुन्हा झेप घेणार आहे.
[ad_2]