[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Hardik Pandya Injury Update : भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya Fitness Updates) विश्वचषकातल्या (World Cup 2023)आणखी दोन साखळी सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. भारतीय संघाच्या श्रीलंका (IND vs SL) आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) संघांविरुद्धच्या सामन्यांमध्ये तो दुखापतीमुळं खेळू शकणार नाही. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात स्वत:च्याच गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण करताना पंड्याच्या पायाचा घोटा दुखावला होता. त्यामुळं बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातून त्याला माघार घ्यावी लागली. त्यानंतर न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांमध्ये पंड्या खेळू शकला नाही. पंड्याच्या दुखापतग्रस्त घोट्यावर बंगळुरुच्या एनसीएत उपचार सुरु असून, त्याला तातडीनं मैदानात उतरवण्याचा भारतीय संघव्यवस्थापनाचा विचार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंड्याला थेट नेदरलँड्सविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात मैदानात उतरवण्यात येईल. हा सामना 12 नोव्हेंबर रोजी बंगळुरुत खेळवण्यात येणार आहे.
भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या दुखापतीमुळं विश्वचषकातल्या (World Cup 2023) आणखी दोन साखळी सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकाविरोधात हार्दिक पांड्या उपलब्ध नसेल, असे वृत्त पीटीआयने दिलेय. बांगलादेशविरुद्धच्या (IND vs BAN) सामन्यात स्वत:च्याच गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण करताना पांड्याचा घोटा दुखावला (Hardik Pandya injury) होता. त्यामुळं मागील रविवारी न्यूझीलंडविरुद्धच्या (IND vs NZ) सामन्यातून त्याला माघार घ्यावी लागली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हार्दिक पांड्या टीम इंडियासोबत मुंबईमध्ये पोहचणार आहे. पण तो खेळण्याची शक्यता नाही. दोन नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये सामना होणार आहे.
Hardik Pandya is likely to return in the Netherlands match. [PTI]
– Good news for India….!!! pic.twitter.com/VBSiUaws3q
— Johns. (@CricCrazyJohns) November 1, 2023
भारत आणि श्रीलंका यांच्यात आमनासामना –
विश्वचषकाच्या रणांगणात रोहित शर्माच्या भारतीय संघाचा सामना उद्या श्रीलंकेशी होतोय.हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. भारतानं विश्वचषकाच्या मोहिमेत आतापर्यंत सहापैकी सहाही सामने जिंकले आहेत. त्यामुळं विश्वचषकाच्या गुणतालिकेत सर्वाधिक १२ गुणांसह भारत अव्वल स्थानी आहे. पण सातव्या स्थानावरच्या श्रीलंकेला सहापैकी केवळ दोनच सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. त्यामुळं विश्वचषकातलं आव्हान टिकवण्यासाठी श्रीलंकेला बलाढ्य भारतीय संघावर विजय मिळवणं आवश्यक आहे. त्यासाठी श्रीलंकेची भिस्त हील प्रामुख्यानं सदीरा समराविक्रमा, पाथुम निसांका आणि कुशल मेंडिस या तीन फलंदाजांवर राहिल. त्या तिघांनीही विश्वचषकात धावांचा रतीब घातला आहे. तसंच दिलशान मधुशंका आणि कासून रजिथा या वेगवान गोलंदाजांचं आक्रमण यशस्वी ठरताना दिसत आहे.
[ad_2]