BCCI Announces Extension Contracts For Head Coach Rahul Dravid And Support Staff For Team India Senior Men( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rahul Dravid : राहुल द्रविडच (Rahul Dravid) भारतीय संघाचा मुख्य कोच म्हणून काम पाहणार आहे. बीसीसीआयने (BCCI) याबाबत अधिकृत माहिती दिली. राहुल द्रविडसह सर्व सपोर्ट स्टापचा कालावधी वाढवण्यात आला आहे. वनडे विश्वचषका 2023 च्या फायनलनंतर (World Cup 2023 Final) राहुल द्रविडचा कार्यकाळ संपला होता. बीसीसीआयने राहुल द्रविड याला कार्यकाळ वाढवण्याची विनंती केली होती. राहुल द्रविड यानेही ही ऑफर स्विकारली आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) एनसीए प्रमुख (Head of NCA ) म्हणूनच काम पाहणार आहे. त्याशिवाय तो स्टँड इन मुख्य कोच असेल. म्हणजेच, राहुल द्रविडच्या अनुपस्थितीत लक्ष्मण भारतीय संघाला धडे देणार आहे. 

राहुल द्रविड यांनी गेली 20 वर्ष भारतीय क्रिकेट संघासोबत एक खेळाडू, कर्णधार आणि प्रशिक्षक म्हणून प्रवास केला. राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2022 टी 20 विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली होती. त्याशिवाय 2021-23 चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनलही गाठली. तसेच 2023 विश्वचषक फायनलही गाठली होती. फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाने लागोपाठ 10 सामन्यात विजय मिळवला होता.

पुन्हा हेड कोच झाल्यानंतर राहुल द्रविड काय म्हणाला ? Rahul Dravid, Head Coach, Team India

राहुल द्रविड म्हणाला की, “टीम इंडियासोबतची गेली दोन वर्षे अविस्मरणीय राहिली आहेत. आम्ही एकत्रपणे चढ-उतार पाहिले आहेत आणि या संपूर्ण प्रवासात संघातील पाठिंबा आणि विश्वास कायम आहे. आम्ही ड्रेसिंग रुममध्ये निर्माण केलेलं वातावरण आणि संस्कृतीचा मला खरोखर अभिमान आहे. ही एक लवचिक संस्कृती आहे, जी विजयाच्या किंवा प्रतिकूल परिस्थितीतही आमच्यासोबत आहे. आपल्या संघाकडे असलेली कौशल्ये आणि प्रतिभा अभूतपूर्व आहे आणि आम्ही ज्यावर भर दिला आहे. योग्य प्रक्रियेचे अनुसरण करणे आणि आमच्या सराव कायम ठेवणे, ज्याचा एकूण कामगिरीवर थेट परिणाम झाला आहे.”

“माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल, माझ्या दूरदृष्टीला पाठिंबा दिल्याबद्दल आणि या मी बीसीसीआय आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो. या भूमिकेत राहण्यासाठी बराच वेळ घरापासून दूर राहणे आवश्यक आहे आणि मी माझ्या कुटुंबाच्या त्याग आणि समर्थनाचं मनापासून कौतुक करतो. त्यांची पडद्यामागची भूमिका मोलाची आहे. विश्वचषकानंतर आम्ही नवीन आव्हाने स्वीकारत असताना, आम्ही उत्कृष्ट कामगिरीचा पाठपुरावा करण्यासाठी वचनबद्ध आहोत.”

बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी काय म्हणाले ?

राहुल द्रविडची दूरदृष्टी, व्यावसायिकता आणि अथक प्रयत्न हे टीम इंडियाच्या यशाचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक या नात्याने राहुल द्रविडची नेहमीच छाननी होत असते. फक्त आव्हाने स्वीकारल्याबद्दलच नव्हे तर त्यात भरभराट केल्याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो. भारतीय संघाची कामगिरी,  धोरणात्मक मार्गदर्शनाचा पुरावा आहे. मुख्य प्रशिक्षकपदाची ऑफर स्वीकारल्या आनंद आहे, असे बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी म्हणाले. 

जय शाह यांची प्रतिक्रिया काय ?

भारतीय संघाचा कोच म्हणून राहुल द्रविडपेक्षा चांगला कुणीही नाही, असे मी आधीच सांगितले होते. द्रविडने स्वतःला पुन्हा सिद्ध केले आहे. टीम इंडिया आता एक मजबूत युनिट आहे आणि तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघ टॉपवर आहे.  राहुल द्रविड यांचं मार्गदर्शन आणि संघासाठी तयार केलेला रोडमॅपवरुन ते दिसतेय.  अंतिम सामन्यापूर्वी सलग 10 सामने जिंकल्यामुळे, आपली विश्वचषक मोहीम काही विलक्षणापेक्षा कमी नव्हती. संघाच्या भरभराटीसाठी योग्य व्यासपीठ तयार केल्याबद्दल राहुल द्रविड कौतुकास पात्र आहे. त्यांना पूर्ण पाठिंबा असेल, असे जय शाह म्हणाले. Related posts