Josh Hazlewood Ruled Out Of World Test Championship final Michael Neser Replaces Him In Australia’s Squad; ऑस्ट्रेलियाला तगडा झटका! प्रमुख वेगवान गोलंदाज WTC फायनलमधून आऊट

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लंडन: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना इंग्लंडमधील ओव्हल स्टेडियमवर ७ जूनपासून खेळवला जाणार आहे. रोहित शर्मा आणि पॅट कमिन्सच्या नेतृत्त्वाखालील संघ जेतेपदाच्या लढतीत आमनेसामने येणार आहेत. त्याचवेळी आयसीसीच्या या अटीतटीच्या लढतीपूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका बसला आहे. यंदाची हि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन्ही संघांसाठी महत्त्वचाही आहे. कारण दोन्ही संघांना पहिल्यांदाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन होण्याचा मान मिळू शकतो. पण तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा सेटबॅक बसला आहे.भारताविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी जोश हेझलवूड पूर्णपणे तंदुरुस्त झाला नाही, त्यामुळे त्याला मोठी किंमत मोजावी लागली आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड अंतिम सामन्यापूर्वी संघाबाहेर झाला आहे. यासोबतच ऑस्ट्रेलिया बोर्डानेही त्याच्या बदलीची घोषणा केली आहे. स्टार वेगवान गोलंदाज त्याच्या दुखापतीतून बराच काळ सावरत होता आणि त्याने आयपीएल २०२३ मध्ये देखील भाग घेतला होता, परंतु तो संपूर्ण सामने खेळू शकला नाही. मात्र, आता तो भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे बाहेर पडला आहे.


त्याच्या जागी या खेळाडूला स्थान

विशेष म्हणजे भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी जोश हेझलवूडच्या जागी अष्टपैलू मायकेल नेसरचा ऑस्ट्रेलिया संघात समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे, नेसर ऑस्ट्रेलियासाठी फक्त २ कसोटी आणि २ वनडे सामने खेळला आहे. त्याच वेळी, तो इंग्लिश कंट्री चॅम्पियनशिपमध्ये ग्लॅमॉर्गनकडून खेळत होता आणि चांगली कामगिरी करत होता. त्या काळात त्याने ५ सामन्यात १ विकेट घेतली आणि ससेक्सविरुद्ध शतकही झळकावले.

आरसीबीसारखे संघ एका विजयासाठी गुडघे टेकतात तिथे १० फायनल आणि ५ ट्रॉफी जिंकतो त्याला धोनी म्हणतात !

अ‍ॅशेज मालिका

कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीनंतर ऑस्ट्रेलियाला इंग्लंडविरुद्ध अ‍ॅशेज मालिका खेळायची आहे. पहिली कसोटी १६ जूनपासून होणार आहे. जोश हेझलवूड त्या संघात कायम आहे. ऑस्ट्रेलियाचे मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली म्हणाले, ‘जोश पूर्ण फिटनेसच्या अगदी जवळ आहे, परंतु आम्हाला माहित आहे की आमच्या आगामी वेळापत्रकाप्रमाणे हा आमचा एकमेव कसोटी सामना नाही. यामुळे जोशला एजबॅस्टनसाठी तयारी करण्याची योग्य संधी मिळेल. ७ आठवड्यांत ६ कसोटी खेळल्या जाणार आहेत आणि वेगवान गोलंदाज खूप महत्त्वाचे असणार आहेत.



[ad_2]

Related posts