Ricky Ponting On Warner Jonson Controversy Says Willingness To Mediate To Settle The Matter Through Talks Between The Two Cricket Australia

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ricky Ponting On Warner-Jonson Controversy : मिचेल जॉन्सनने डेव्हिड वॉर्नरवर केलेल्या सडकून टीकेनंतर ऑस्ट्रेलियासह मीडियामध्येही चांगलीच खळबळ उडाली आहे. आता माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सची एकापाठोपाठ एक विधाने समोर येत आहेत. ताजे नाव आहे ते ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगचे. या दिग्गज खेळाडूने आता माध्यमांमध्ये हे प्रकरण पुढे येऊ नये यासाठी उपाय सुचवला आहे. त्याने वॉर्नर आणि जॉन्सनला एका खोलीत बसवून चर्चेद्वारे प्रकरण मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

दोघांनीही एकमेकांशी बोलून हा मुद्दा शांत करावा

सनरायझर्सशी बोलताना पॉन्टिंग म्हणाला की, ‘मला आता या दोन लोकांमध्ये यावे लागेल. या दोघांना एका खोलीत आणण्यासाठी मी मध्यस्थ असणे आवश्यक आहे असे दिसते. माध्यमांमध्ये हा मुद्दा उपस्थित करण्याऐवजी दोघांनीही एकमेकांशी बोलून हा मुद्दा शांत करावा. पाँटिंग म्हणतो, ‘हे दोन्ही लोक खूप संतापले आहेत आणि आम्हाला माहित आहे की हे प्रकरण 6 ते 8 महिने जुने आहे. अॅशेस मालिकेसाठी निवडीच्या वेळी हा वाद सुरू झाला. हे असेच चालू राहिले कारण दोघेही समोरासमोर बसून त्यावर बोलले नाहीत. हे आता घडावे अशी माझी इच्छा आहे.

कलंक लावणाऱ्यांना कसला निरोप देता? तो हिरो आहे का??

डेव्हिड वॉर्नरने कसोटी सामन्यांमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 14 डिसेंबरपासून पाकिस्तानविरुद्ध सुरू होणारी तीन सामन्यांची मालिका ही त्याची शेवटची कसोटी मालिका आहे. याबाबत ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज मिचेल जॉन्सनने (Mitchell Johnson on David Warner) एका लेखाद्वारे वॉर्नरवर निशाणा साधला होता. त्याने लिहिले होते की, सॅन्ड पेपर प्रकरणात दोषी ठरलेल्या वॉर्नरला सन्माननीय नायकाचा निरोप का मिळत आहे? जॉन्सनने असेही लिहिले की, खराब फॉर्म असूनही वॉर्नरला कसोटी संघात का स्थान देण्यात आले? जॉन्सनच्या या वक्तव्यानंतर हे प्रकरण अजून तापले आहे.

मिशेल जाॅन्सनने फक्त डेव्हिड वॉर्नरवर टीका केली नाही, तर ऑस्ट्रेलियाच्या मुख्य निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांच्यावरही प्रहार केला. ज्या खेळाडूने ऑस्ट्रेलियाचे नाव बदनाम केले होते, त्याच खेळाडूला आता नायक म्हणून निरोप दिला जात असल्याचा घणाघाती हल्ला मिचेल जॉन्सनने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर वॉर्नरवर चढवला. बॉल टॅम्परिंग प्रकरणात डेव्हिड वॉर्नर दोषी आढळला होता. 

इतर महत्वाच्या बातम्या 

[ad_2]

Related posts