Suryakumar Yadav Most Player Of The Match Awards In Men T20I Compare To Rohit Sharma And Virat Kohli India Vs South Africa

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

South Africa vs India, Suryakumar Yadav : टी-20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 106 धावांनी पराभव केला. या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) झंझावाती शतक झळकावले. सूर्याची ‘प्लेअर ऑफ द मॅच’ आणि ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ म्हणून निवड झाली. या सामन्यात चमकदार कामगिरी करत त्याने रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि हार्दिक पांड्याचे (Hardi Pandya) विक्रम मोडीत काढले. जोहान्सबर्गमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाच्या विजयासह मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली.

सूर्या 60 सामन्यात 14 वेळा सामनावीर

कॅप्टन सूर्यकुमार यादवने तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात दमदार शतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी तोच ठरला. सूर्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत अवघ्या 60 सामन्यात 14 वेळा सामनावीर पुरस्कार पटकावला आहे. हिटमॅन रोहितने 148 सामन्यात 12 वेळा, तर किंग कोहलीने 115 सामन्यात 15 वेळा हा मान पटकावला आहे. 

‘प्लेअर ऑफ द सीरीज’ जिंकण्याच्या बाबतीत सूर्या दुसऱ्या क्रमांकावर

टीम इंडियासाठी सर्वाधिक वेळा ‘प्लेअर ऑफ द सीरीज’ जिंकण्याच्या बाबतीत सूर्या दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या बाबतीत त्याने रोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पांड्यासह अनेक खेळाडूंना मागे टाकले आहे. सूर्याने हे विजेतेपद चारवेळा जिंकले आहे. रोहित आणि पांड्याने प्रत्येकी दोनदा हा पुरस्कार पटकावला आहे. भुवनेश्वरने तीन वेळा हे विजेतेपद पटकावले आहे. भारतासाठी टी-20 मध्ये सर्वाधिक वेळा ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ जिंकण्याचा पुरस्कार विराट कोहलीच्या नावावर आहे. कोहलीने हे विजेतेपद सातवेळा जिंकले आहे.

टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 201 धावा केल्या होत्या. यादरम्यान सूर्याने शतक झळकावले. त्याने 56 चेंडूंचा सामना करत 100 धावा केल्या. सूर्याने या खेळीत 7 चौकार आणि 8 षटकार मारले. सलामीवीर यशस्वी जैस्वालने 41 चेंडूंचा सामना करत 60 धावा केल्या. त्याने 6 चौकार आणि 3 षटकार मारले. भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ 95 धावांवर गडगडला. भारताकडून कुलदीप यादवने 5 बळी घेतले.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. यानंतर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 5 विकेट्सने विजय मिळवला. पावसामुळे या सामन्यावरही परिणाम झाला. यानंतर टीम इंडियाने तिसरा सामना जिंकला आणि मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली.

इतर महत्वाच्या बातम्या 



[ad_2]

Related posts