[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
India Women vs England Women : महिला क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात नवी मुंबईत कसोटी सामना खेळला जात आहे. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 136 धावांवर गडगडला. नवी मुंबईतील डी. वायय पाटील स्टेडियमवर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. दीप्ती शर्माने 5 बळी घेतले. स्नेह राणाला 2 बळी मिळाले. इंग्लंडकडून नॅट सायव्हर ब्रंटने अर्धशतक झळकावले. भारताच्या पहिल्या डावानंतर ब्युमॉंट आणि डंकली सलामीला आल्या. डंकली जास्त वेळ क्रीजवर टिकू शकला नाही. 10 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 11 धावा करून ती बाद झाली. रेणुका सिंहने तिला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. 35 चेंडूत 10 धावा करून ब्युमॉंट बाद झाली. कर्णधार हीदर नाईटलाही विशेष काही करता आले नाही. 23 चेंडूत 11 धावा करून ती बाद झाली. पूजा वस्त्राकरने नाइटला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
नॅट सायव्हरने चांगली फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. तिनं 70 चेंडूंचा सामना करत 59 धावा केल्या. सायव्हरच्या या खेळीत 10 चौकारांचा समावेश होता. तिला स्नेह राणाने बाद केले. डेनियल व्याट 19 धावा करून बाद झाली. दीप्ती शर्माने तिला बाद केले. दीप्तीने यष्टिरक्षक फलंदाज अॅमी जोन्सलाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. जोन्स 12 धावा करून बाद झाली. अशाप्रकारे संपूर्ण संघ 136 धावांवर गडगडला. इंग्लंडचा संघ केवळ 35.3 षटकेच खेळू शकला.
टीम इंडियाकडून गोलंदाजी करताना दीप्ती शर्माने 5 बळी घेतले. त्याने 5.3 षटकात फक्त 7 धावा देत 4 मेडन षटके टाकली. स्नेह राणाने 6 षटकात 25 धावा देत 2 बळी घेतले. रेणुका आणि पूजा वस्त्राकर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. राजेश्वरी गायकवाडलाएकही यश मिळाले नाही. तिने 6 षटकात 25 धावा दिल्या.
टीम इंडिया दुसऱ्या दिवशी ऑलआऊट
दरम्यान, पहिल्या डावात 428 धावा करून टीम इंडिया दुसऱ्या दिवशी ऑलआऊट झाली. दीप्ती शर्मा आणि जेमिमाह रॉड्रिग्जसह चार खेळाडूंनी अर्धशतके झळकावली. हरमनप्रीत कौरचे अर्धशतक हुकले. ती 49 धावांवर बाद झाली. इंग्लंडकडून लॉरेन बेल आणि सोफी एक्लेस्टोनने 3-3 बळी घेतले.
सामन्याच्या पहिल्या दिवशी स्मृती मानधना आणि शफाली वर्मा टीम इंडियासाठी सलामीला आल्या. मंधानाने 12 चेंडूंचा सामना करत 17 धावा केल्या. त्याने 3 चौकार मारले. शेफालीने 19 धावा केल्या. शुभा सतीश आणि जेमिमा यांनी चांगली भागीदारी केली. शुभाने 76 चेंडूंचा सामना करत 69 धावा केल्या. तिने 13 चौकार मारले. जेमिमाने 99 चेंडूत 68 धावा केल्या. तिने 11 चौकार मारले. कर्णधार हरमनप्रीतचे अर्धशतक हुकले. ती 49 धावा करून बाद झाली. हरमनप्रीतने 81 चेंडूंचा सामना करत 49 धावा केल्या. यास्तिका भाटियाने 88 चेंडूंचा सामना करत 66 धावा केल्या. दीप्ती शर्मानेही अर्धशतक झळकावले. तिनं 113 चेंडूंचा सामना करत 67 धावा केल्या. स्नेह राणा 30 धावा करून बाद झाली. पूजा वस्त्राकर 10 धावा करून नाबाद राहिली.
इतर महत्वाच्या बातम्या
[ad_2]