[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
IND vs SA 1st ODI LIVE : भारतीय क्रिकेट संघ (Team India) आजपासून (17 डिसेंबर) दक्षिण आफ्रिकेत नवीन सुरुवात करणार आहे. विश्वचषक फायनलनंतर प्रथमच टीम इंडिया वनडे फॉरमॅटमध्ये मैदानात उतरणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज होत आहे. दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारली आहे. टीम इंडियाकडून साई सुदर्शननं पर्दापण केलं आहे. संजू सॅमसनला संघात संधी देण्यात आली आहे. पहिला एकदिवसीय सामना जोहान्सबर्गमध्ये भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता खेळवला जाईल. सामन्याची नाणेफेक 1 वाजता होणार आहे. भविष्य डोळ्यासमोर ठेवून या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. केएल राहुल वनडे मालिकेत टीम इंडियाची कमान सांभाळणार आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या टी-20 मालिकेत सूर्यकुमार यादवने टीम इंडियाचे नेतृत्व केले होते, मात्र एकदिवसीय मालिकेत केएल राहुलकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या एकदिवसीय संघात समावेश नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, शुभमन गिल, रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे स्टार खेळाडू नाहीत.
खेळपट्टी कशी असेल?
जोहान्सबर्गच्या न्यू वांडरर्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या मैदानावर खूप धावा केल्या जातात. आजही उच्च स्कोअरिंग सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. हे तेच मैदान आहे जिथे ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 434 धावा केल्या होत्या आणि त्याच सामन्याच्या दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेने ऐतिहासिक आव्हानाचा पाठलाग करत 438 धावा केल्या होत्या.
[ad_2]