Sai Sudarshan Will Play For Team India For The Next 15 Years A Former Cricketer Irfan Pathan Predicted

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sai Sudharsan IND vs SA : साई सुदर्शनने अलीकडेच टीम इंडियासाठी आपला पहिला एकदिवसीय सामना खेळला. जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात सुदर्शनने नाबाद अर्धशतक झळकावले. टीम इंडियाच्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने सुदर्शनचे कौतुक केले आहे. सुदर्शन दीर्घकाळ टीम इंडियात राहील, असा त्याला विश्वास आहे. सुदर्शनच्या अर्धशतकी खेळीनंतर इतर अनेक दिग्गजांनी त्याचे कौतुक केले आहे.

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना इरफान पठाण म्हणाला, “जर दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांवर कोणी असे खेळत असेल, तर तुम्हाला पुढील 10-15 वर्षांसाठी चांगला खेळाडू मिळाला आहे. हे सांगणे खूप घाईचे आहे, परंतु सुरुवात चांगली आहे. त्याने खूप चांगली सुरुवात केली आहे. जर तुम्ही त्याची फलंदाजी पाहिली तर तुम्हाला अंदाज येईल की तो शॉर्ट बॉल खूप चांगला खेळतो. फूटवर्कचा चांगला वापर करतो.

साई सुदर्शनचा देशांतर्गत सामन्यांमध्ये चांगला रेकॉर्ड आहे. त्याने 12 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 843 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 2 शतके आणि 3 अर्धशतके केली आहेत. या काळात सुदर्शनची सर्वोत्तम धावसंख्या 179 धावा होती. त्याने 26 लिस्ट ए सामन्यात 1324 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 6 शतके आणि 5 अर्धशतके केली आहेत. त्याने 31 टी-20 सामन्यात 976 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 6 अर्धशतके केली आहेत. सुदर्शन इंडियन प्रीमियर लीगमध्येही खेळला आहे.

सुदर्शनला अजून बरेच सामने खेळण्याचा अनुभव नाही. पण तो प्रतिभावान आहे. सुदर्शनने डिसेंबर 2022 मध्ये प्रथम श्रेणी सामन्यांसाठी पदार्पण केले. डिसेंबर 2021 मध्ये त्याने लिस्ट ए साठी पदार्पण केले. सुदर्शन देशांतर्गत सामन्यांमध्ये तामिळनाडूकडून खेळतो. आता त्याने टीम इंडियातही स्थान मिळवले आहे.

साई सुदर्शनचा पदार्पणात भीम पराक्रम

दरम्यान, पहिल्या वनडेत टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा एकतर्फी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी दिली. या सामन्यात सलामीवीर साई सुदर्शनला (Sai Sudarshan Debut) भारताकडून पदार्पणाची संधी मिळाली. वयाच्या 22 व्या वर्षी साईला आंतरराष्ट्रीय कॅप मिळाली. भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तो 400 वा खेळाडू ठरला. विशेष म्हणजे साईने पहिल्याच सामन्यात ज्या आत्मविश्वासाने फलंदाजी केली ती पाहता तो पहिलाच सामना खेळत आहे असे कधीच जाणवले नाही. त्याने पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावत नाबाद 55 धावा केल्या. अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय सलामीवीर फलंदाज ठरला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

[ad_2]

Related posts