Poco M6 5g Launching Today At 12 Check Expected Price Specs And Availability

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Poco M6 5G Launch : चीनची स्मार्टफोन कंपनी पोको आज भारतात स्वस्त 5G फोन लाँच केला आहे. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टच्या माध्यमातून तुम्ही मोबाईल फोन खरेदी करू शकाल. Poco M6 5G  मध्ये तुम्हाला ड्युअल कॅमेरा सेटअप आणि 256 GB पर्यंत स्टोरेजसह MediaTek Dimensity 6100+ चिपसेटचा सपोर्ट मिळेल. जाणून घ्या हा फोन कोणत्या किंमतीत लाँच होणार आहे.

अशी असेल किंमत 

पोकोने काही काळापूर्वी आपल्या कम्युनिटी ग्रुपमध्ये एक पोस्टर शेअर केले होते. त्यात हा फोन 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच करण्यात येणार असून त्याच्या बेस मॉडेलची किंमत 9,499 रुपये असू शकते, असं सांगितलं होतं. कंपनी  Poco M6 5G 4,6/128 GB आणि 8/256 GB व्हेरिएंटमध्ये लाँच करू शकते. वरच्या मॉडेलची किंमत 12,000 रुपये असू शकते. हा स्मार्टफोन तुम्ही ब्लॅक आणि ब्लू कलरमध्ये खरेदी करू शकाल. 

कॅमेरा आणि प्रोसेसर 
 

Poco M6 5G मध्ये कंपनी तुम्हाला 50 MP प्रायमरी कॅमेरा आणि 2 MP मॅक्रो कॅमेरासह ड्युअल कॅमेरा सेटअप देईल. लीकनुसार, मोबाइल फोनमध्ये  Redmi 13C सारखेच फीचर्स मिळू शकतात, ज्यात 5000 एमएएच बॅटरी, 90hz  रिफ्रेश रेटसह 6.74 इंचाचा डिस्प्ले आणि 5 MP सेल्फी कॅमेरा असू शकतो.

रेडमी 13सी 5 जी च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने 4/128 जीबी, 6/128 GB आणि 8/256 GB अशा 3 स्टोरेज ऑप्शनमध्ये लाँच केले आहे. याची किंमत अनुक्रमे 9,999 रुपये, 11,499 रुपये आणि 13,499 रुपये आहे. काही दिवसांपूर्वीच रियलमीने भारतात realme C67 5G  स्मार्टफोन लाँच केला आहे. 4/128 जीबी ची किंमत 13,999 रुपये आहे. या फोनमध्येही तुम्हाला 5000 एमएएच बॅटरी, 50 MP कॅमेरा आणि डायमेंसिटी 6100+ चिपसेटचा सपोर्ट मिळतो.

Poco C65 लाँच 

पोको कंपनीने आपल्या ग्राहकांना खूश करण्यासाठी नवा फोन Poco C65 लाँच केला आहे. हा एक बजेट फोन आहे. Poco C65(Poco C65 Mobile)  मध्ये 50 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा, मीडियाटेक हेलियो G85  चिपसेट आणि 8GB पर्यंत रॅम देण्यात आली आहे. स्मार्टफोनला दोन वर्षांसाठी अँड्रॉइड ओएसचे प्रोटेक्शन मिळेल.

भारतात Poco C65 स्मार्टफोन तीन व्हेरियंटसह सादर करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या 4 जीबी + 128 जीबी स्टोरेजची किंमत 8,499 रुपये आहे, तर 6 जीबी + 128 जीबी 9,499 रुपये  तर 8 जीबी + 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे. हा फोन मॅट ब्लॅक आणि पेस्टल ब्लू कलर ऑप्शनसह लॉंच करण्यात आला आहे. फ्लिपकार्टवरून खरेदीसाठी उपलब्ध असेल. ग्राहकांना 1000 रुपयांपर्यंतची सूट घेता येईल, परंतु यासाठी युझर्सला आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डद्वारे पैसे द्यावे लागतील.

इतर महत्वाची बातमी-

Money Transfer : चुकीच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर? टेन्शन घेऊ नका, ताबडतोब ‘या’ नंबरवर कॉल करा, पैसे परत मिळतील!

 

 

 

[ad_2]

Related posts