[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Big Bash League : बिग बॅश लीगमध्ये रविवारी (दि.31) मेलबर्न स्टार्स (Melbourne Stars) विरुद्ध अॅडिलेड स्ट्राईकर्स (Adelaide Strikers) हा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मेलबर्न स्टार्सच्या संघाने अॅडिलेड स्ट्राईकर्सचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला. मेलबर्न स्टार्सच्या ब्यू वेबस्टर (Beau Webster) आणि मार्कस स्टोयनिसने केलेल्या (Marcus Stoinis) फटकेबाजीच्या जोरावर मेलबर्नच्या संघाने हा विजय मिळवला. ओवलच्या मैदानावर हा सामना खेळवण्यात आला होता. दरम्यान, या सामन्यात ब्यू वेबस्टरने 108 मीटरचा लांबलचक षटकार लगावलाय. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. बिग बॅश लीगच्या चालू हंगामातील हा सर्वात मोठा षटकार आहे.
बिग बॅशच्या यंदाच्या हंगामातील सर्वात मोठा षटकार
बिग बॅश लीगमध्ये ही आयपीएलप्रमाणे जोरदार फटकेबाजी पाहायला मिळते. अनेक खेळाडू लांबलचक षटकार लगावताना दिसतात. असाच एक षटकार मेलबर्नच्या संघातील खेळाडून लगावलाय. ब्यू वेबस्टरने ब्रेंडन डोगेट गोलंदाजीसाठी आला असता 108 मीटरचा लांबलचक षटकार लगावलाय. षटकार मारल्यानंतर चेंडू स्टेडियमच्या सर्वात वरच्या भागात पडलाय. अॅडिलेड स्ट्राईकर्सने दिलेल्या 206 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 11 षटकात त्याने जोरदार फटकेबाजी केली. याच षटकात त्याने हा षटकार लगावला. बिग बॅश लीगच्या यंदाच्या हंगामातील हा सर्वात मोठा षटकार आहे.
आयपीएलमध्ये अनसोल्ड राहिलाय ब्यू वेबस्टर (Unsold In IPL)
बिग बॅश लीगमध्ये जोरदार फटकेबाजी करणारा ब्यू वेबस्टर आयपीएलमध्ये मात्र अनसोल्ड राहिला होता. त्याच्यावर कोणत्याही संघाने बोली लावली नव्हती. त्याने आयपीएलसाठी केवळ 20 लाख बेस प्राईस ठेवली होती. बिग बॅश लीगच्या चालू हंगामात त्याने 5 सामने खेळले आहेत. यातील 4 सामन्यात तो फलंदाजीसाठी उतरलाय. या 4 सामन्यात त्याने 164 धावा केल्या आहेत.
BEAU WEBSTER INTO THE TOP DECK 😱#BBL13 pic.twitter.com/BmMKV4ljG7
— Melbourne Stars (@StarsBBL) December 31, 2023
मेलबर्नसमोर होते 206 धावांचे आव्हान
ओवलमध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात अॅडिलेड स्ट्राईकर्स प्रथम फलंदाजीसाठी उतरले होते. प्रथम फलंदाजी करताना अॅडिलेडच्या संघाने 205 धावा केल्या आणि मेलबर्नसमोर 206 धावांचे आव्हान ठेवले. अॅडिलेडकडून क्रिस लीनने 42 चेंडूमध्ये 83 तर मॅथ्यू शॉर्टने 32 चेंडूमध्ये 56 धावा केल्या. यानंतर अॅडिलेडच्या 206 धावांच्या आव्हानासाठी उतरलेल्या मेलबर्नच्या संघाने 19 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. मेलबर्नकडून ब्यू वेबस्टरने 48 चेंडूमध्ये 66, मार्कस स्टोयनिसने 19 चेंडूमध्ये 55 तर डेनियल लॉरेंन्सने 26 चेंडूमध्ये 50 धावा केल्या. मेलबर्नच्या संघाने ब्रेंडम डोगेटची चांगलीच धुलाई केली. त्याच्या 3 षटकांमध्ये मेलबर्नने 40 धावा काढल्या.
इतर महत्वाच्या बातम्या
Viral News : क्रिकेटच्या मैदानात नेत्याची जोरदार बॅटिंग, पण शॉट मारताना गेला तोल; तोंडावर पडतानाचा मजेदार Video व्हायरल
[ad_2]