Samsung Galaxy Unpacked 2024 Date Galaxy S24 Series AI Focused Features More

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Samsung Galaxy Unpacked 2024 :  कोरियन कंपनी सॅमसंग गॅलेक्सी एस 24 (Samsung )सीरिज  17 जानेवारीला लाँच होणार आहे. या दिवशी कंपनीचा गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंट होणार असून, यामध्ये कंपनी सॅमसंग गॅलेक्सी एस 24, सॅमसंग गॅलेक्सी एस 24 प्लस आणि सॅमसंग गॅलेक्सी एस 24 अल्ट्रा लाँच करणार आहे. हा इव्हेंट कॅलिफोर्नियामध्ये होणार असून, तो तुम्ही कंपनीच्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून लाईव्ह पाहू शकाल. लाँचिंगपूर्वी तिन्ही स्मार्टफोनची प्री-बुकिंग सुरू झाली आहे. जर तुम्ही आता स्मार्टफोनचे प्री-बुकिंग केले तर तुम्हाला अनेक फायदे मिळतील. याविषयी जाणून घ्या…

प्री-बुकर्सना मिळणार ‘हा’ फायदा 

जर तुम्ही सॅमसंग गॅलेक्सी एस 24 सीरिजचे प्री-बुकिंग केले तर कंपनी तुम्हाला 5,000 रुपयांचा अतिरिक्त फायदा देईल. तसेच जुना फोन एक्सचेंज केल्यावर तुम्हाला बेस्ट व्हॅल्यू आणि स्पेशल एडिशन फोन आणि सॅमसंग क्लब मेंबर होण्याची संधी मिळेल, ज्यामध्ये कंपनी वेलकम वॉचर कंपनी ला 5,000 रुपयांपर्यंत देऊ शकते. मोबाइल फोनचे प्री-बुकिंग करण्यासाठी आता 1,999 रुपये मोजावे लागतील, जे रिफंडेबल आहे. डिव्हाइस बुक करण्यासाठी तुम्हाला सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

किती असेल किंमत? 

लीक्समध्ये असे म्हटलं जात आहे की, कंपनी नवीन सीरीज ही मागील सीरीजच्या प्राइज रेंजनुसार लाँच करू शकते.  S23 ची सुरुवात 74,999 रुपये अशी झाली होती. foneaerna च्या रिपोर्टनुसार, कंपनी पूर्वीच्या सीरीजपेक्षा कमी किंंमतीत नवीन सीरीज युरोपमध्ये लाँच करू शकते. आम्ही खाली वेबसाइटची किंमत तुमच्यासोबत शेअर करत आहोत. या 

Samsung Galaxy S24 8GB + 128GB – 899 युरो ( रु 82,940)
Samsung Galaxy S24 8GB + 256GB – 959 युरो ( रु 88,465)
Samsung Galaxy S24+ 12GB + 256GB – 1,149 युरो (रु 1,06,015)
 Samsung Galaxy S24+ 12GB + 512GB – 1,269 युरो (रु. 1,17,090)
Samsung Galaxy S24 Ultra 12GB + 256GB – 1,449 युरो (1,33,695)
 Samsung Galaxy S24 Ultra 12GB + 512GB – 1,569 युरो  (1,44,800)
 Samsung Galaxy S24 Ultra 12GB + 1TB – 1,809 युरो (रु 1,66,950)

Galaxy S24 अल्ट्रा स्पेक्स काय आहे? 

या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 120Hz च्या रिफ्रेश रेट आणि 6.8 इंचाचा QHD Plus डिस्प्ले मिळू शकतो.  हा मोबाईल फोन क्वालकॉमच्या नवीन चिपसेटवर काम करेल.  स्मार्टफोनला 2600 nits ची पीक ब्राइटनेस मिळू शकते.  फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप असेल ज्यामध्ये 200MP वाइड लेन्स, 50MP 5x टेलिफोटो लेन्स, 10MP 3x टेलीफोटो लेन्स आणि 12MP अल्ट्रावाइड लेन्स असतील.  कंपनी फ्रंट कॅमेरआसाठी 12MP कॅमेरा देऊ शकते. हे अल्ट्रा मॉडेल कंपनी 4 कलर ऑप्शन मध्ये लाँच करू शकते ज्यात टायटॅनियम ग्रे, ब्लॅक, व्हायलेट आणि यलो यांचा समावेश आहे.  Galaxy S24 Ultra मध्ये 45 वॉट वायर्ड चार्जिंग, 15 वॉट वायरलेस चार्जिंग आणि 4.5 वॉट रिव्हर्स चार्जिंगसह 5000 mAh बॅटरी मिळू शकते.

इतर महत्वाची बातमी-

Free Netflix : Jio आणि Airtel युजर्ससाठी खुशखबर! आता तुम्ही नेटफ्लिक्स पाहू शकता! पाहा कोणते आहेत प्लॅन्स?

 

 

[ad_2]

Related posts