[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
सलामीचा ज्यो बर्न्स आणि उस्मान ख्वाजा यांनी दुसऱ्या विकेटसाठी रचलेल्या 258 धावांच्या भागिदारीनं ऑस्ट्रेलियाला वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीवर वर्चस्व मिळवून दिलं. मेलबर्नच्या या बॉक्सिंग कसोटीत ऑस्ट्रेलियानं पहिल्या दिवसअखेर तीन बाद 345 धावांची मजल मारली, त्यात बर्न्स आणि ख्वाजाच्या शतकांचा मोलाचा वाटा होता. ज्यो बर्न्सनं 230 चेंडूंमधली 128 धावांची खेळी 16 चौकार आणि एका षटकारानं सजवली. उस्मान ख्वाजाच्या 227 चेंडूंमधल्या 144 धावांच्या खेळीला सहा चौकार आणि एका षटकाराचा साज होता. बर्न्स आणि ख्वाजा माघारी परतल्यानंतर कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि अॅडम वोग्स यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाची सूत्रं सांभाळली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला, त्या वेळी स्मिथ 32 धावांवर आणि अॅडम वोग्स दहा धावांवर खेळत होता
[ad_2]