Shaun Marsh Retirement : The Australian Player Who Won The Orange Cap In The First Season Of IPL Announced His Retirement Cricket News Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shaun Marsh Retirement : ऑस्ट्रेलियाचा (Australia) दिग्गज खेळाडू शॉन मार्शने (Shaun Marsh) क्रिकेटमधून (Cricket)निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. मार्श बीग बॅश लीगमध्ये (Big Bash League) सिडनी थंडर या संघाच्या विरोधात कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणार असल्याचे त्याने स्पष्ट केलंय. त्याने कारकिर्दीत अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्याने इंडियन प्रिमिअर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएलमध्ये अनेकदा फटकेबाजी केली होती. आयपीएलच्या पहिल्या हंगामात त्याने सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप पटकावली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटबरोबरच त्याने डोमेस्टिक क्रिकेटमध्येही कमाल केली होती. 

सध्या शॉन मार्श बीग बॅश लीगमध्ये मेलबर्न रेनेगेड्स या संघासाठी खेळत आहे. त्याने मेलबर्न स्टार्सच्या विरोधात उत्कृष्ट कामगिरी केली होती. शॉन मार्शने 49 चेंडूमध्ये 64 धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने 10 चौकार लगावले आणि नाबादही राहिला. मार्शच्या या दमदार कामगिरीच्या जोरावर मेलबर्न रेनेगेड्सच्या संघाने 6 विकेट्सने विजय मिळवला. दरम्यान, मार्शने कारकिर्दीतील शेवटचा सामना सिडनी थंडरच्या विरोधात खेळणार असल्याचे स्पष्ट केले. हा सामना 17 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर तो क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. 

आयपीएलमध्ये मार्शच्या नावावर कोणते विक्रम (Shaun Marsh Retirement)

शॉन मार्शची आयपीएल कारकिर्द दिमाखदार होती. तो आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज या संघासाठीच खेळला. पूर्वी या संघाचे नाव किंग्ज इलेव्हन पंजाब असे होते. आयपीएलमध्ये त्याने 2008 साली पदार्पण केले होते. पहिल्याच हंगामात त्याने सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप पटकावली होती. मार्शने आयपीएलमध्ये 71 सामने खेळले. त्याने 2477 धावा केल्या आहेत. त्यामध्ये 1 शतक आणि 20 अर्धशतकांचा समावेश आहे. 115 धावा ही त्याची आयपीएलमधील सर्वोच्च कामगिरी आहे.

आतंरराष्ट्रीय कारकिर्द कशी होती?

शॉन मार्शची आंतरराष्ट्रीय कारकिर्दही प्रभावी राहिली आहे. त्याने 73 वनडेमध्ये 2773 धावा केल्या. यामध्ये 7 शतक आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे. 151 धावा ही त्याची एकदिवसीय क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरी आहे. वनडे आणि आयपीएल शिवाय कसोटीमध्ये मार्श मागे नव्हता. त्याने 38 कसोटी सामने खेळले. त्यामध्ये त्याने 2265 धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 6 शतक आणि 10 अर्धशतकांची नोंद आहे. मार्शने पदार्पणातच दमदार कामगिरी केली होती. त्याने पदार्पणातील पहिला सामना वेस्टइंडिज विरोधात खेळला होता. या सामन्यात त्याने 7 चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने 81 धावा ठोकल्या होत्या. 

इतर महत्वाच्या बातम्या 

India vs Afghanistan T20 : कोहलीच्या पुनरागमनामुळे गिलचा पत्ता कट होणार? अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या T20 मध्ये किती बदल होणार

[ad_2]

Related posts