Whatsapp Bring News Updates For Channels Including Voice Notes Pollas And Lot More

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Whatsapp Channel Update :  सध्या सगळीकडे whatsapp चा वापर केला जातो.  चॅट करणे ,ऑडिओ-व्हिडिओ (Whatapp Update) शेअर करणे,ऑडिओ-व्हिडिओ कॉल करणे यासाठी त्याचा वापर केला जातो. कंपनी प्रत्येक वेळी यूजर्स साठी अनेक खास फिचर्स घेऊन येते. आता व्हॉट्सॲप चॅनलवर नवीन अपडेट्स पाहायला मिळणार आहे.यामध्ये व्हॉइस नोट्स ,मल्टीपल ऍडमिन , आणि स्टेटस आणि पोलवर शेअरिंग करणं शक्य होणार आहे. 

मार्क जुकेरबर्ग यांनी व्हॉट्सॲप चॅनलवर बेस्ट गेम ऑफ ऑल टाइम याच्या पोलसाठी वोट मागितले आहेत आणि सांगितले आहे की ‘आम्ही व्हॉट्सॲप चॅनेलसाठी काही नवीन फिचर्स आणत आहोत. ज्यामध्ये व्हॉइस नोट्स, मल्टिपल ॲडमिन्स, स्टेटसवर शेयरिंग आणि पोल या गोष्टींचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार व्हॉट्सॲप वरील नवीन फिचर्स हे अँड्रॉइड, आयओएस आणि वेबवर लागू करण्यात येणार आहेत. सोबतच आता हळूहळू जगातील सगळ्या लोकांसाठी हे फिचर्स उपलब्ध करण्यात येणार आहे. 

व्हॉइस अपडेट 

हा व्हॉट्सॲपमधील मोस्ट अवेटेड फिचर्स मधील एक फिचर आहे. वॉइस अपडेट चॅनल ॲडमिनला वॉइस नोट पाठवण्यासाठी परवानगी देतो.जेणेकरून तो त्यांच्या फॉलोवरसोबत जास्तीत जास्त कनेक्ट होऊ शकेल. व्हॉट्सअॅपचे म्हणणं आहे की हा प्लॅटफॉर्ममध्ये पहिल्यापासून 7 बिलियन व्हॉइस नोटचा वापर केला आहे.

शेअर टु स्टेटस 

व्हॉट्सअॅप चॅनल आणि युजर कनेक्शन यांच्यामधील अंतर शेअर टु स्टेटस या फिचर्समुळे कमी होणार आहे. युजर्स त्यांच्या आवडत्या चॅनलची अपडेट अगदी सहजरित्या  व्हॉट्सॲप स्टेटसवर शेअर करू शकतात. 

मल्टिपल अॅडमिन्स 

व्हॉट्सअॅप चॅनेल मल्टिपल ऍडमिन्स फिचर्समुळे ग्रुप मॅनेजमेंटला अधिक चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करू शकतो. 16 एडमिन्स ठेवण्यासोबत प्लॅटफॉर्मवर युजर्सना चॅनलमध्ये कम्युनिकेशन व्यवस्थित करण्यासाठी मदत करतो. याच कारणामुळे युजर्सना नवीन लेटेस्ट डेव्हलपमेंट याची माहिती मिळणं सोपं होतं. 

अनेकांचे WHATSAPP चॅनल

या नवीन फिचरचा वापर आता जगभरातील 500 मिलियन लोक करत आहेत. यामध्ये आता कॅटरीना कैफ ,विजय देवरकोंडा यांसारखे दिग्गज आणि मुंबई इंडियन्स म,र्सिडीज एफ वन , नेटफ्लिक्स यासारखे ब्रँड यांच्या प्रोफाईल सुद्धा आहेत. व्हॉट्सॲप चॅनल आता लोकांच्या  वैयक्तिक चॅटमध्ये दखल देऊन सगळ्या लोकांशीवाय किंवा संघटनांशिवाय महत्वपूर्ण अपडेट देण्यासाठी मदत करते. अगदी थोडक्यात इंस्टाग्रामवर आलेल्या काही ब्रॉडकास्ट फिचर सारखेच हे काम करते.

इतर महत्वाची बातमी-

iPhone 14 Discount : फ्लिपकार्टवर iPhone 14 वर बंपर डिस्काउंट; 60,000 रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता iPhone 14

 

 

 

[ad_2]

Related posts