Virat Kohli withdrawal from the first two Tests against England BCCI requested media and fans to respect Kohli privacy and refrain

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Virat Kohli : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनं (Virat Kohli) इंग्लंडविरुद्धच्या (England) 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमधून तो बाहेर पडला आहे. म्हणजेच तो पहिले दोन सामने खेळणार नाही. खुद्द भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ही माहिती दिली आहे. बीसीसीआयने सांगितले की,’विराट कोहलीने बीसीसीआयला वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतील पहिल्या दोन कसोटींमधून माघार घेण्याची विनंती केली आहे. विराटने कर्णधार रोहित शर्मा, संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांशी चर्चा केली आहे. देशाचे प्रतिनिधित्व करणे हे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिल यावर कोहलीने भर दिला.

‘कोहलीच्या गोपनीयतेचा आदर करा’

बीसीसीआयने म्हटले आहे की, ‘बीसीसीआय त्याच्या निर्णयाचा आदर करते. बोर्ड आणि संघ व्यवस्थापनाने स्टार फलंदाजाला पाठिंबा दिला आहे आणि उर्वरित संघाकडून कसोटी मालिकेत कौतुकास्पद कामगिरी करण्याचा पूर्ण विश्वास आहे. ‘बीसीसीआय मीडिया आणि चाहत्यांना विनंती करते की विराट कोहलीच्या गोपनीयतेचा आदर करावा आणि त्याच्या वैयक्तिक कारणांबद्दल अंदाज लावू नये. आगामी कसोटी मालिकेत खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करायला हवे. विराटच्या बदलीची घोषणा लवकरच केली जाईल.

विराट कोहलीची कसोटी कारकीर्द

  • 113 सामने, 8848 धावा, 49.15 सरासरी
  • 29 शतके, 30 अर्धशतके, 55.56 स्ट्राइक रेट
  • 991 चौकार, 26 षटकार

पहिला कसोटी सामना हैदराबाद येथे होणार 

भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील पहिला कसोटी सामना 25 जानेवारीपासून खेळवला जाणार आहे. हा सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, उप्पल, हैदराबाद येथे होणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ आधीच जाहीर झाला आहे. संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक

  • पहिली कसोटी : 25-29 जानेवारी, हैदराबाद
  • दुसरी कसोटी : 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टणम
  • तिसरी कसोटी : 15-19 फेब्रुवारी, राजकोट
  • चौथी कसोटी : 23-27 फेब्रुवारी, रांची
  • 5वी कसोटी : 7-11 मार्च, धर्मशाला

पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.

कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघ

बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, शोएब बशीर, डॅन लॉरेन्स, जॅक क्राउली, बेन डकेट, बेन फोक्स, टॉम हार्टले, जॅक लीच, ऑली पोप, ऑलि रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts