[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
IND vs ENG Live Streaming & Broadcast : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG Test) यांच्यामध्ये उद्यापासून पाच सामन्याच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Rajiv Gandhi International Stadium, Hyderabad) भारत आणि इंग्लंडचे संघ आमनेसामने असतील. इंग्लंडच्या संघाने त्याआधीच आपल्या प्लेईंग 11 ची घोषणा केली आहे. दुसरीकडे भारतीय संघात कुणीची वर्णी लागणार?? याबाबत चर्चा सुरु आहे. विराट कोहलीने पहिल्या दोन कसोटी सामन्यातून माघार घेतली आहे. रजत पाटीदार याला रिप्लेसमेंटची घोषणा केली आहे. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकच्या जागी ओली पोप खेळणार आहे. 12 वर्षांपासून इंग्लंडच्या संघाने भारतात मालिका जिंकलेली नाही. भारतात मालिका जिंकण्यासाठी इंग्लंडचा मैदानात उतरले. कसोटी सामना कधी सुरु होणार? कुठे पाहता येणार? याबाबतची माहिती जाणून घेऊयात…
कधी अन् कुठे होणार सामना ?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना 25 जानेवारी रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार, सकाळी 9.30 मिनिटांनी सामन्याला सुरुवात होणार आहे.
कुठे पाहाल लाईव्ह स्ट्रिमिंग ?
भारतीय चाहते हा सामना स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर लाईव्ह पाहू शकतात. त्याशिवाय मोबाईलवर जिओ सिनेमावरही लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येईल. जिओ सिनेमावर चाहते हिंदी, इंग्लंजीशिवाय इतर भाषांमध्ये सामन्याचा आनंद घेऊ शकतात. जिओ सिनेमावर सामना पाहण्यासाठी सब्सक्रिप्शन घ्यावे लागणार नाही. म्हणजे, फुकटात सामना पाहता येणार आहे. मोबाईलमध्ये जिओ सिनेमाचं अॅप असेल तर अथवा वेबसाईटवरही जाऊन मोफत सामना पाहता येईल.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्याच्या कसोटी मालिकेचं वेळापत्रक –
पहिला टेस्ट: भारत vs इंग्लंड, 25-29 जानेवारी, हैदराबाद (राजीव गांधी इंटरनेशनल स्टेडियम)
दुसरा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टणम (डॉ. वाईएस राजशेखर क्रिकेट स्टेडियम)
तिसरा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 15-19 फेब्रुवारी, राजकोट (सौराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम)
चौथा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 23-27 फेब्रुवारी, रांची (जेएससीए इंटरनेशनल स्टेडियम)
पाचवा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 7-11 मार्च, धर्मशाला (हिमांचल प्रदेश क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम)
पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची प्लेईंग 11 –
बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), शोएब बशीर, जॅक क्रॉली, बेन फॉक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, जॅक लीच, ओली पोप, जो रूट आणि मार्क वूड.
इंग्लंडविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया –
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उप कर्णधार), आवेश खान, रजत पाटीदार
आणखी वाचा :
पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, 4 फिरकी गोलंदाज उतरणार, 690 विकेट घेणारा गोलंदाज बाहेर
[ad_2]