[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Voter Id Card Online : देशात दरवर्षी 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा ( Voter ID Online) केला जातो. या खास दिवशी लोकांना मतदार ओळखपत्र बनवून मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. 2011 मध्ये राष्ट्रीय मतदार दिनाची सुरुवात झाली. खरे तर भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाली आणि 2011 पासून तो दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी 25 जानेवारी 2011 रोजी पहिल्यांदा राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला होता. तेव्हापासून दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. जर तुम्ही अजून मतदार कार्ड बनवलं नसेल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. आम्ही तुम्हाला अत्यंत सोप्या पद्धतीने ऑनलाईन व्होटर कार्ड कसे बनवायचे हे सांगणार आहोत.
घरी बसून अर्ज कसा करावा?
-ऑनलाइन व्होटर कार्ड बनवण्यासाठी फोन किंवा लॅपटॉपवरून https://voters.eci.gov.in/ जा. यानंतर फोन नंबरच्या मदतीने तुमचा आयडी तयार करा.
-त्यानंतर त्याच आयडीवरून ओटीपी टाकून लॉगिन करा.
-डाव्या बाजूला वरच्या बाजूला नवीन मतदार म्हणून नोंदणी करण्याचा पर्याय दिसेल
– फॉर्म 6 भरा. या पर्यायावर क्लिक करा.
-आता तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल, नाव, पत्ता भरा. आपला फोटो अपलोड करा आणि आपल्या घरातील एखाद्या सदस्याचा मतदार कार्ड क्रमांक भरा. यानंतर पत्ता म्हणून आधार कार्ड अपलोड करा.
-सर्व माहिती भरल्यानंतर ती पुन्हा तपासून सबमिट करा.
-यानंतर तुम्हाला एक अॅप्लिकेशन आयडी मिळेल, तो सुरक्षित ठेवा.
-सुमारे 1 आठवड्यानंतर अपडेट घेऊ शकता.
-व्होटर कार्ड तयार झाल्यानंतर तुम्ही ते डाऊनलोड करू शकता. काही दिवसांनी मतदार कार्ड तुमच्या घरीही पोहोचेल.
-जर तुम्हाला इंग्रजीचा त्रास होत असेल तर तुम्ही वेबसाईटची भाषा हिंदी करू शकता. उजव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यात भाषा बदलण्याचा पर्याय आहे.
मोदींकडून नव्या मतदारांना मतदार नोंदणीचं आवाहन
येत्या काहीच महिन्यांत निवडणुका होणार आहे. देशात तरुणांची मोठी संख्या आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन मतदारांना नावनोंदणी करण्याचं आवाहन केलं आहे. मागील काही दिवसांत मोदींच्या झालेल्या प्रत्येक भाषणात या नव्या मतदारांचा उल्लेख आहे. त्यामुळे जर तुम्ही अजूनही नावनोंदणी केली नसेल तर मतदार नोंदणी करुन घ्या.
इतर महत्वाची बातमी-
Mobile Scrapping Policy : 5वर्षे जुना फोन बंद होणार? सरकारची नवी मोबाइल स्क्रॅप पॉलीसी, सोशल मीडियावर फिरत असलेल्या ‘त्या’ मेसेज मागचं सत्य काय?
अधिक पाहा..
[ad_2]