Tom Hartley on debut was hit for a six on the very first ball he picked 9 wickets in the match

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Tom Hartley : जेव्हा शिकार करणाऱ्याची शिकार होते, अशी स्थिती टीम इंडियांची हैदराबाद कसोटीत झाली. पहिले दोन दिवस सामन्यावर पूर्ण नियंत्रण ठेवूनही टीम इंडियाला इंग्लंडकडून पहिल्या कसोटीत दारुण पराभव स्वीकारावा लागला. पर्दापण करणारा टॉम हार्टलीसमोर टीम इंडियांच्या धुरंदरांनी अक्षरश: नांगी टाकली आणि 28 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. हैदराबाद कसोटीत भारतीय संघाला विजयासाठी 231 धावांचे लक्ष्य होते. टीम इंडियाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी शानदार सुरुवात केली, मात्र यानंतर टॉम हार्टलीने डाव टाकण्यास सुरुवात केली. टॉम हार्टलीसमोर भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्करली. या फिरकी गोलंदाजाने भारताच्या 7 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. 

या टॉम हार्टलीबद्दल तुम्हाला किती माहिती आहे? मात्र, आज आपण टॉम हार्टलीच्या कारकिर्दीवर एक नजर टाकणार आहोत.

टॉम हार्टलीने सात फलंदाजांची शिकार 

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माशिवाय टॉम हार्टलीने यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, अक्षर पटेल, केएस भरत, रवी अश्विन आणि मोहम्मद सिराज यांची शिकार केली. टॉम हार्टलीने पदार्पणाच्या कसोटीत छाप सोडण्यात यशस्वी झाला. तसेच आगामी 4 कसोटी सामन्यांमध्ये टॉम हार्टले टीम इंडियाच्या फलंदाजांसमोर कठीण आव्हान देऊ शकतो.

पहिल्या कसोटीत इंग्लंडने बाजी मारली

मात्र, पहिल्या डावात टॉम हार्टलीची कामगिरी निराशाजनक होती. पहिल्या डावात 131 धावा केल्यानंतर टॉम हार्टले केवळ 2 भारतीय फलंदाजांना बाद करू शकला. यानंतर टॉम हार्टलीला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले, मात्र दुसऱ्या डावात या गोलंदाजाने शानदार गोलंदाजी सादर केली. दुसऱ्या डावात टॉम हार्टलेने 62 धावांत 7 बळी घेतले. अशाप्रकारे टॉम हार्टलीने पदार्पणाच्या कसोटीत 9 फलंदाजांना बाद केले.

टॉम हार्टलीची आतापर्यंतची कारकिर्द 

टॉम हार्टली यांचा जन्म 3 मे 1999 रोजी लँकेशायरमध्ये झाला. हा उंच फिरकी गोलंदाज त्याच्या अचूक टप्प्यासाठी ओळखला जातो. टॉम हार्टलीने 2020 मध्ये लँकेशायरसाठी प्रथम श्रेणी पदार्पण केले. द हंड्रेडच्या पहिल्या सत्रात टॉम हार्टले मँचेस्टर ओरिजिनल्सकडून खेळला. यानंतर टॉम हार्टलीला आयर्लंड दौऱ्यासाठी इंग्लंड वनडे संघाचा भाग झाला.  हा दौरा टॉम हार्टलीसाठी काही खास नसला तरी भारत दौऱ्यासाठी टॉम हार्टलीला संधी देण्यात आली. ॉ

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts