ओव्हलवर मराठीचा गजर!  WTC Final  मध्ये रहाणे-शार्दूलचा मराठीतून संवाद, व्हिडीओ व्हायरल

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)
WTC Final 2023 : अजिंक्य रहाणे आणि शार्दूल ठाकूर या मराठमोळ्या खेळाडूंनी आक्रमक फलंदाजी करत भारताच्या डावाला आकार दिला. शार्दूल-रहाणे या जोडीने फलंदाजी करताना आपली वेगळी छाप सोडली. याचे कारण म्हणजे खेळपट्टीवर असताना एकमेकांना प्रोत्साहन देत दोघेही मराठीमध्ये संवाद साधत होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

शार्दूल आणि अजिंक्य रहाणे यांच्या दमदार फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. फलंदाजी करताना दोघांनी खेळपट्टीवर मराठीतून संवाद साधत प्रतिस्पर्धी खेळाडूंना रणनितीपासून दूर ठेवले.  रहाणे शार्दुलला मराठीमधून सूचना देत होता.  रहाणे म्हणाला की,  “खेळत रहा खेळत रहा शाब्बास, एक एक बॉलचा विचार कर फक्त, चांगलं आहे खेळत रहा.” त्यावर शार्दुल रहाणेला म्हणतो, “पॉइंट मागे केला हा.” मराठीतून बोलतानाचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

पाहा व्हिडीओ

ना डोंबिवली ना पालघर,
लंडनमध्येही मराठीचा गजर!#WTCFinal2023 #AjinkyaRahane #म pic.twitter.com/NhhKT6vY9Q

— CCBK: Coffee, Cricket Aani Barach Kaahi (@CCBKMarathi) June 10, 2023

लॉर्ड शार्दूल ठाकूर आणि अजिंक्य राहणे यांनी खडूस फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या मनसुब्यावर पाणी फेरले. 6 बाद 152 अशी दयनीय अवस्था टीम इंडियाची झाली होती. त्यावेळी मुंबईकर अजिंक्य रहाणे आणि शार्दूल ठाकूर ऑस्ट्रेलियाला नडले.. मोक्याच्या क्षणी दोघांनी शतकी भागिदारी केली. 145 चेंडूत 109 धावांची भागिदारी करत ऑस्ट्रेलियाच्या मनसुब्यावर पाणी फेरले. शार्दूल आणि अजिंक्य रहाणे यांच्या भागिदारीमुळे टीम इंडियावरील फॉलोऑनचे संकट टाळले. अजिंक्य रहाणे याने तब्बल 18 महिन्यानंतर कसोटीत कमबॅक केलेय. आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे एखाद्या योद्ध्याप्रमाणे लढला. रविंद्र जाडेजासोबत अजिंक्य रहाणे याने 71 धावांची भागिदारी केली. त्यानंतर शार्दूलच्या मदतीने 109 धावांची भर पाडली.

अजिंक्य रहाणेची दमदार खेळी -

अजिंक्य रहाणे याने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. जाडेजा विस्फोटक फलंदाजी करत असताना रहाणे याने दुसऱ्या बाजूला चिवट फलंदाजी केली. जाडेजा बाद झाल्यानंतर रहाणे याने आक्रमक रुप धारण केले. राहणे याने 11 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 89 धावांची खेळी केली. 2021 मध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये रहाणे याने सर्वाधिक धावा काढल्या होत्या. आताही रहाणे याने सर्वाधिक धावा चोपल्या आहेत. त्याशिवाय कसोटी क्रिकेटमध्ये पाच हजार धावांचा पल्ला पार केलाय.

शार्दूलचा लढा -

लॉर्ड शार्दूल ठाकूर याने अष्टपैलू खेळीचे प्रदर्शन केले. गोलंदाजीत चमक दाखवल्यानंतर फलंदाजीतही महत्वाचे योगदान दिले. आघाडीचे फलंदाज ढेपाळल्यानंतर शार्दूल ठाकूर याने चिवट फलंदाजी केली. शार्दूल ठाकूर याने 109 चेंडूत 51 धावांची खेळी केली. शार्दूल ठाकूर याने ओव्हल याने लागोपाठ तीन सामन्यात अर्धशतक झळकावलेय. असा पराक्रम करणारा तिसरा विदेशी खेळाडू ठरलाय. याआधी असा पराक्रम ब्रॅडमन आणि बॉर्डर यांनी केलाय. या यादीत शार्दूलचा समावेश झालाय.

[ad_2]

Related posts