[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Irfan Pathan Tweet On IND vs AUS, WTC Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतावर विजय मिळवला. टीम इंडियाच्या दारुण पराभवानंतर माजी अष्टपैलू खेळाडू आणि समालोचक इरफान पठाणने केलेलं ट्विट चांगलंच व्हायरल होत आहे. इरफानने भारताचा पराभव झाल्यानंतर एक ट्विट केले आहे, ज्यात त्याने पाकिस्तानच्या चाहत्यांचा समाचार घेतलाय. ‘ही लोकं खूप आनंदी आहेत कारण, वरल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारताचा पराभव झाला, असेही त्याने पुढे म्हटले आहे.
सोशल मीडियावर इरफान पठाणने केलेलं ट्विट व्हायरल
भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणचे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. याबरोबरच अनेक युजर्स यावर कमेंटकरून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. इरफानने ट्विट करत पाकिस्तानी फॅन्सवर निशाणा साधला आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानी फॅन्स इरफानला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. त्यानंतर इरफाननेही ट्रोलर्सना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
Suddenly all the padosi’s are entering my time line with happiness cos team India lost the WTC FINAL. I was so right abt them… #grace
— Irfan Pathan (@IrfanPathan) June 11, 2023
भारताच्या पराभवानंतर इरफान पठाणचे जुने ट्वीट वापरुन पाकिस्तानच्या ट्रोलर्सले निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. 23 ऑक्टोबर रोजी इरफान पठाण याने Padosiyon Sunday kesa raha??? असे ट्वीट केले होते. याच दिवशी टी20 विश्वचषकात टीम इंडियाने पाकिस्तानचा चार विकेटने पराभव केला होता. या सामन्यात विराट कोहलीने दमदार फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला होता. या सामन्यानंतर रविवार कसा होता… असा सवाल इरफान पठाण याने विचारला होते. आज ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केल्यानंतर चे ट्वीट पुन्हा एकदा चर्चेत आले. पाकिस्तानच्या ट्रोलर्सनी ते ट्वीटच्या आधारावर Sunday kaisa raha असा सवाल इरफानला विचारलाय. 23 ऑक्टोबरचे ट्वीट रिट्विट करत पाकिस्तान ट्रोलर्स इरफानला डिवचत होते. इरफान पठाण याने त्यांना आपल्या शब्दात उत्तर देत बोलती बंद केली.
Padosiyon Sunday kesa raha???
— Irfan Pathan (@IrfanPathan) October 23, 2022
Sunday kaisa raha @IrfanPathan 💀😹 https://t.co/oeA6nIXEMw pic.twitter.com/dvZM5QIGkz
— SYED🚩 (@Ooye_Syed) June 11, 2023
Irfan pathan getting ready to tweetpic.twitter.com/WbsyhTWifM https://t.co/FyRQxLQX4U
— Sharjeel (@sharjeel_exe) June 11, 2023
Irfan pathan looks so helpless rn. Even though he’s trying his best to serve cunt ,act normal and bossy, his emotions are dripping over and i can see his cry through phone. https://t.co/j2SXMP6pCK
— maheen. (@matchwinnner) June 11, 2023
Irfan bhai ainda Sunday wala tweet nhii krnaa… krwa di na apni bezztii
— Waqas Abbasi (@WaqasAb59414416) June 11, 2023
[ad_2]