[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
चेतेश्वर पुजारा-
WTC फायनलच्या आधी चेतेश्वर पुजारा इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळत होता. तरी देखील तो अंतिम सामन्यात फ्लॉप ठरला. जानेवारी २०१९ नंतर पुजाराने कसोटीत फक्त एक शतक झळकावले आहे, ते देखील बांगलादेशविरुद्ध होय. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतात झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत तो अपयशी ठरला होता. गेल्या चार पैकी ३ वर्षात त्याची सरासरी ३० पेक्षा खाली आहे. अशाच ३५ वर्षीय पुजारासाठी संघात स्थान मिळेल का याबाबत शंका वाटते.
उमेश यादव-
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये उमेश यादव हा भारतासाठीची गोलंदाजीतील सर्वात कमकुवत बाजू ठरली. उमेशची परदेशातील कामगिरी घरच्या मैदानापेक्षा चांगली आहे. पण त्याच्या फिटनेसचा देखील मुद्दा आहे. संघात संधी मिळावी यासाठी अनके युवा गोलंदाज वाट पाहत आहेत अशात सातत्याने अपयशी ठरणाऱ्या उमेशला पुन्हा संधी मिळेल असे वाटत नाही.
अजिंक्य रहाणे-
अजिंक्य रहाणे याने टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या. असे असले तरी संघ भविष्यासाठी त्याचा विचार करेल असे वाटत नाही. पुढील टेस्ट चॅम्पियनशिप दोन वर्षानंतर आहे आणि तेव्हा रहाणे ३७ वर्षांचा असेल. अशात भारताला युवा खेळाडूला तयार करावे लागले. तसे देखील रहाणेला या वेळी श्रेयस अय्यरला दुखापत झाली होती म्हणून संधी मिळाली होती.
रोहित शर्मा-
कर्णधार रोहित गेल्या काही वर्षात भारतासाठी सर्वोत्तम कसोटी फलंदाज ठरला आहे. पण हे देखील तितकेच खरे आहे की त्याच्या कामगिरीत सातत्याने घसरण होत आहे. मोठी खेळी करण्यात तो अपयशी ठरत आहे. अनेक वेळा चांगली सुरुवात करून देखील रोहितला मोठी धावसंख्या करता आली नाही. फायनलमध्ये दुसऱ्या डावात रोहितचे पुन्हा असेच झाले. चांगल्या सुरुवातीनंतर त्याने विकेट टाकून दिली. अशात ३६ वर्षीय रोहित संघात फिट बसत नाही.
विराट कोहली-
काही वर्षापूर्वी विराटची कसोटीतील सरासरी ५५ इतकी होती, आता ती ४९च्या खाली आली आहे. २०१९ नंतर कसोटीत त्याच्या नावावर फक्त एकच शतक आहे. परदेशात तर २०१८ नंतर त्याने एकही शतक केले नाही. फायनल मॅचमध्ये देखील सेट झाल्यानंतर तो मोठी धावसंख्या करू शकला नाही. परदेशात तो पुन्हा पुन्हा ड्राइव्ह खेळताना बाद होतोय. अशाच विराट आणखी किती काळ कसोटी संघात दिसेल याबाबत शंकाच वाटते.
[ad_2]