MPL 2023 Ruturaj Gaikwad Kedar Jadhav Puneri Bappa WIN By 8 Wickets

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

MPL 2023 : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने (एमसीए) आयोजित केलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) स्पर्धेचे  दिमाखात उद्घाटन झाले. सलामीच्या लढतीत पुणेरी बप्पाने कोल्हापूर टस्कर्सचा पराभव केला. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील पुणे संघाने केदार जाधवच्या कोल्हापूर संघावर आठ विकेटने विजय मिळवत दणक्यात सुरुवात केली. 

कोल्हापूरने दिलेल्या 145 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऋतुराज गायकवाड आणि पवन शाह यांनी वादळी सुरुवात केली. दोघांनी चौफेर फटकेबाजी करत पुण्याची धावसंखेला आकार दिला. 10 षटकात दोघांनी 110 धावांची सलामी दिली. या जोडीपुढे कोल्हापूरचे गोलंदाज फिके वाटत होते. ऋतुराज गायकवाड याने 27 चेंडूत वादळी 64 धावांची खेळी केली. या खेळीत ऋतुराज गायकवाड याने पाच चौकार आणि पाच षटकारांचा पाऊस पाडला. तर पवन शाह याने 48 चेंडूत 57 धावांची खेळी केली. यामध्ये सहा चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. सलामीची जोडी माघारी परतल्यानंतर सुरज शिंदे आणि यश क्षिरसागर यांनी पुण्याला विजय मिळवून दिला. सुरज शिंदे याने 11 धावांची खेळी केली.  कोल्हापूरकडून श्रेयस चव्हाण आणि तरणजीत सिंह यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.

कोल्हापूरची 144 धावांपर्यंत मजल 

पुणे संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. प्रथम फलंदाजी करताना अंकित बावणेच्या 57 चेंडूत 72 धावांच्या झाजंवती खेळीच्या जोरावर कोल्हापूर टस्कर्स संघाने 20 षटकात 7 बाद 144 धावांची मजल मारली. केदार जाधव (22चेंडूत 25धावा, 3चौकार, 1षटकार) आणि अंकित बावणे यांनी कोल्हापूर संघाला वेगवान सलामी दिली. रोहन दामले याने केदार जाधवला बाद करुन ही जोडी फोडली. त्यानंतर मैदानात उतरलेला एमपीएल मधील सर्वात महागडा खेळाडू नौशाद शेख केवळ 24 चेंडूत 20 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर कोल्हापूरचा डाव 2 बाद 119 वरून अखेर 7 बाद 144 घसरला. पुणेरी बाप्पा कडून पियूष साळवी (3-18) आणि सचिन भोसले(3-40) यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. 

अंकित बावणे आणि केदार जाधव यांनी कोल्हापूर संघाला दमदार सलामी दिली. दोघांनी 8 षटकात 65 धावांची भागिदारी केली. कर्णधार केदार बाद झाल्यानंतर अंकित बावणे याने सुत्रे हातात घेतली. अंकित बावणे याने 57 चेंडूत 72 धावांची खेळी केली. त्याशिवाय नौशाद शेख याने 0 धावांचे योगदान दिले. या तिघांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. 



[ad_2]

Related posts