[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
world cup 2023, India-Pak : भारतात होणाऱ्या विश्वचषकाला 100 दिवसांपेक्षा कमी दिवस बाकी आहेत. दोन दिवसांपूर्वी आयसीसीने विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा केली. विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर प्रत्येकजण सामना पाहायला जाण्यासाठी प्लॅनिंग करत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या हायहोल्टेज सामन्यासाठी तर आतापासूनच बुकिंग सुरु झाली आहे. 15 ऑक्टोबर 2023 रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थरार रंगणार आहे. हा सामना पाहण्यासाठी चाहत्यांनी तयारी सुरु केली आहे. पण अहमदाबाद येथील हॉटेलमधील रुमचे दर दहा पटीने वाढले आहेत. 15 ऑक्टोबरपच्या आसपास राहण्यासाठी बुकिंगला सुरुवात झाली आहे. सध्यापेक्षा तब्बल दहा पटीने दर वाढल्याचे समोर आलेय. प्रति दिवस पाच हजार रुपयांना मिळणारी रुम 15 ऑक्टोबरच्या वेळीस 50 हजार रुपयांना मिळत आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायहोल्टेज सामना 15 ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडिअमवर होणार आहे. सामन्यावेळी हॉटेलच्या किमतीमध्ये दहा पटीने वाढ झाल्याचे समोर आलेय. वेगवेगळ्या संकेतस्थळ अथवा अॅपवरुन बुकिंग सुरु झाली आहे. दहापटीने रुमचे दर वाढले आहेत. काही हॉटेलच्या किमती एका दिवसासाठी एक लाख रुपयांपर्यंत पोहचल्या आहेत. काही रुम बुकही झाल्या आहेत.
इतर दिवशी अहमदाबादमध्ये लक्झरी हॉटेलमध्ये पाच हजार आणि आठ हजार रुपयांमध्ये रुम मिळते. आता याच किमती 50 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत पोहचल्या आहेत. ‘booking.com’नुसार, ITC Hotel मधील डिलक्स रुम दोन जुलै रोजी 5699 रुपयांपाना मिळते. हीच रुम 15 ऑक्टोबर रोजी 71 हजार 999 रुपयांना आहे. Renaissance Ahmedabad Hotel on SG Highway या हॉटेलमध्ये सध्या प्रति दिवस 8 हजार रुपयांना रुम मिळते, पण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान ही रुम 90 हजार 679 रुपयांत आहे. Pride Plaza Hotel मध्ये 36,180 रुपयांना रुम भाड्याने मिळेल. येणाऱ्या रविवारी साबरमती रिव्हरफ्रंट कामा हॉटेल येथे तीन हजार रुपयांना रुम मिळते. हीच रुम 15 ऑक्टोबर रोजी 27 हजार 233 रुपयांना मिळते. ITC Narmada, Marriott, Hyatt आणि Taj Skyline Ahmedabad या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये 15 ऑक्टोबर रोजी एकही रुम उपलब्ध नाही.
Ahmedabad नरेंद्र मोदी स्टेडिअवर कोणते कोणते सामने होणार ?
5 ऑक्टोबर – इंग्लंड vs न्यूझीलंड
15 ऑक्टोबर – भारत vs पाकिस्तान
4 नोव्हेंबर – इंग्लंड vs ऑस्ट्रेलिया
10 नोव्हेंबर – दक्षिण आफ्रिका vs अफगाणिस्तान
19 नोव्हेंबर – Final
आणखी वाचा :
पाकिस्तानला झटका, अहमदाबादच्याच मैदानावर रंगणार भारत-पाकिस्तानचा थरार
ICC World Cup 2023 Schedule : विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरपर्यंत रंगणार थरार!
[ad_2]