[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Twitter Restrictions: एलॉन मस्क यांनी शनिवारी,रात्री एकापाठोपाठ अनेक ट्विट केले. या ट्विटमध्ये मस्क यांनी त्यांच्या नवीन ट्वीटर (Twitter) नियमावलीविषयी माहिती दिली आहे. या ट्विटध्ये मस्क यांनी लिहिल्यानुसार, आता ट्विटरवरील कंटेट पाहण्यासाठी त्याआधी तुम्हाला ट्विटर अकाऊंट ओपन असायला हवं. या अकाऊंशिवाय ट्विटरचा कोणताही कंटेट पाहता येणार नाही. असं म्हटलं जातंय की, मस्क यांनी ट्विटरवरील डाटा चोरीमुळे हा निर्णय घेतला आहे. तर त्यांचा दुसरा निर्णय वाचक मर्यादेशी संबंधित आहे. मस्क यांनी सगळ्या लोकांसाठी वाचक मर्यादा निश्चित केली आहे. या नवीन नियमानुसार, ज्या युजर्सनी पैसे मोजून ब्लू टिक घेतलं आहे त्यांना दिवसभरात फक्त 10,000 ट्वीट्सच वाचता येणार आहेत. यासोबत जे अनव्हेरिफाईड युजर्स आहेत ते फक्त 1,000 ट्वीट्स वाचू शकणार आहेत. जे नव्यानं ट्विटर जाईन केले आहेत ते फक्त 500 पोस्ट्स वाचू शकणार आहेत. यामुळे आता ट्विटवर प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली आहे. यावरून भारतात आता #RipTwitter हा ट्रेंड सुरू झाला आहे. यामुळे ब्लू स्कायवरील (Bluesky) युजर ट्रॅफिकमध्ये रेकॉर्ड ब्रेक वाढ झाली आहे.
Bluesky वरील वाढले युजर्स ट्रॅफिक
मस्क यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे Bluesky या प्लॅटफॉर्मला फायदा होत आहे. Bluesky च्या युजर ट्रॅफिकमध्ये रेकॉर्ड ब्रेक वाढ झाली आहे. हे ट्रॅफिक इतकं वाढलं की Bluesky चं प्लॅटफॉर्म ठप्प पडलं. याविषयी Bluesky ला एक ट्विटही करावं लागलं. Bluesky हे डिसेंट्रलाईज्ड सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असून ट्विटरपेक्षा खूप वेगळे आहे. सध्या ज्यांना Bluesky प्लॅटफॉर्म जॉईन करायचं आहे त्यांना इन्व्हाईट करण्याची आवश्यकता आहे. याचा अर्थ असा आहे की, इन्व्हाईट केल्यानंतरचं Bluesky च्या अॅपमध्ये जाईन होऊ शकता. याविषयी कंपनीनं ट्विट करत सांगितलं की, या प्लॅटफॉर्मला पुन्हा पुर्ववत करण्यासाठी अडचणीं दूर केल्या जात आहेत. यासोबत युजर्सना पुन्हा एकदा अँड्रॉई़ड आणि आयओएसच्या अॅपमध्ये साईन-अप करता येणार आहे. सध्या Bluesky चे मालक ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी आहेत.
आता मेटा आणत आहे ट्विटरसारखं अॅप
आता ट्विटरला टक्करला देण्यासाठी मेटानं Threads अॅप आणत आहे. यासंबंधित सोशल मीडियावर अनेक फोटोही व्हायरल झाले आहेत. मेटाचं हे नवीन अॅप ट्विटरसाखंच आहे. ज्यामध्ये तुम्हाला लाईक, शेअर आणि री-ट्विट करू शकाल. सध्या या अॅपच्या टेस्टिंचं काम सुरू असून काही विशिष्ट युजर्ससाठी उपलब्ध आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या वाचा :
BlueSky: ट्विटरला पर्याय BlueSky, ट्विटरच्या माजी सीईओने जाहीर केलं नवीन फिचर
[ad_2]