[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
क्रिकेट हा फक्त त्याच्यासाठी खेळ नव्हता, तर आयुष्य होतं. त्यामुळे जेव्हा त्याने निवृत्तीची निर्णय जाहीर केला तेव्हा तो सर्वांसमोर ढसाढसा रडत होता. निवृत्तीच्यावेळी आपल्या लाडक्या खेळाडूला रडताना चाहत्यांनी पाहिले. त्यावेळी चाहतेही त्याच्या निवृत्तीच्यावेळी हेलावले होते. आपला लाडका खेळाडू आता विश्वचषकात खेळणार नाही, याची खंत चाहत्यांना होती. पण आज या चाहत्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आली. कारण आता त्यांचा हा लाडका खेळाडू विश्वचषकात खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गुरुवारी एक पत्रकार परिषद घेत त्याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली होती. बांगलादेशचा वनडे कर्णधार तमिम इक्बालने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. यामुळे त्याच्या १६ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला अचानक पूर्णविराम लागला असल्याचे म्हटले जात होते. पत्रकारांच्या गर्दीने वेढलेला तमीम खूप भावूक झाला होता आणि बोलत असताना अश्रू अनावर झाले होते. त्यामुळे बांगलादेशचे चाहते निराश झाले होते, तर काही चाहत्यांना आता विश्वचषकात बांगलादेशचे नेतृत्व कोण करणार, याची चिंता सतावत होती. पण शुक्रवारी तमीमने बांगालदेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये त्याच्या निवृत्तीचाही विषय निघाला. त्यावेळी पंतप्रधान यांनी तमीमला आपली निवृत्ती मागे घेण्यास सांगितली. त्यानंतर तमीमने आपल्या निवृत्तीचा निर्णय मागे घेतला असून तो आता विश्वचषकात बांगलादेशचे कर्णधारपद भूषवणार आहे.
एखा खेळाडूच्या निवृत्तीबाबत पंतप्रधानांनी निवृत्ती घ्यावी, असे कदाचित यापूर्वी घडले नसेल. पण त्यामुळे आता हा धोकादायक खेळाडू विश्वचषक खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
[ad_2]