Rajasthan In Playoff Race How Can Rr Reach Ipl 2023 Playoffs With Just 14 Points 2023 Ipl Live Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

RR in Chances in IPL 2023 Playoff : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये सध्या प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी सात संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. आतापर्यंत फक्त गुजरात टायटन्स हा एकमेव संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. हैदराबाद आणि दिल्ली या शर्यतीमधून बाहेर गेले आहे. राजस्थान रॉयल्स (RR) संघ सध्या 12 गुणांसह आयपीएल पॉइंट टेबलवर (IPL 2023 Points Table) सहाव्या क्रमांकार आहे. गुणतालिकेत सध्या सहाव्या क्रमांकावर असणाऱ्या राजस्थान संघांसाठी प्लोऑफमध्ये पोहोचण्याची काहीशी धुसर आशा कायम आहे.

राजस्थान बाजी पलटणार? 

आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत 65 सामने झाले आहेत आणि गुजरात टायटन्स हा एकच संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. साखळी सामने संपायला फक्त तीन दिवस उरले आहेत, तर पाच सामने शिल्लक आहेत. प्लेऑफमध्ये अद्यापही तीन जागा रिकाम्या आहेत. एकूण सात संघ शर्यतीत प्लेऑफच्या शर्यतीत आहेत, पण यामध्ये पाच संघांसाठी हे समीकरण सोपं आणि इतर दोन संघांना प्लेऑफममध्ये पोहोचणं जवळजवळ अशक्य आहे.

प्लेऑफमध्ये पोहोचू शकतो रॉयल्स संघ

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 मध्ये आज 66 वा सामना पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात संध्याकाळी 07:30 वाजता खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघ आजचा सामना जिंकून आयपीएल प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आपली अंधुकशी आशा कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील. दोन्ही संघांचे 13 सामन्यांत समान 12 गुण आहेत, पण उत्तम रनरेटच्या आधारावर राजस्थानचा संघ पंजाबपेक्षा पुढे आहे. दोन्ही संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकतात, पण त्यासाठी त्यांना आजच्या सामन्यासोबतच इतर संघांच्या कामगिरीवरही लक्ष ठेवावं लागेल. 

नक्की समीकरण काय? जाणून घ्या…

राजस्थान संघाला 14 गुणांपर्यंत पोहोचण्यासाठी पंजाब किंग्स (PBKS) विरुद्धचा शेवटचा सामना जिंकणं आवश्यक आहे. त्याशिवाय राजस्थान संघाला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्सवर अवलंबून राहावं लागेल. जर आरसीबी संघ त्यांच्या शेवटच्या सामन्या एका धावेने जरी पराभव झाला तर राजस्थान संघ (RR) पंजाबला (PBKS) नेट रनरेटमध्ये मागे टाकेल आणि त्यानंतर राजस्थानला प्लेऑफमध्ये स्थान मिळू शकतं.

आयपीएल पॉइंट्स टेबलमध्ये चेन्नई (CSK) दुसऱ्या स्थानावर आहे पण प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी त्यांना 20 मे रोजी दिल्ली संघाचा पराभव करावा लागेल. हा सामना हरल्यास त्यांना मुंबई, बंगळुरू, लखनौ यांच्या सामन्यांच्या निकालावर अवलंबून राहावं लागेल.

लखनौ आणि चेन्नई दोन्ही संघांकडे प्रत्येकी 15 गुण आहेत, तर नेट रन रेटच्या आधारे लखनौ तिसऱ्या क्रमांकावर आहे. 20 मे रोजी कोलकाता विरुद्धच्या सामन्यात लखनौ संघानं विजय मिळवला तर, लखनौला प्लेऑफमध्ये स्थान मिळेल. लखनौ पराभूत झाल्यास चेन्नई, मुंबई आणि बंगळुरू संघाने किमान एका सामना गमवाला तर लखनौला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी मिळेल.

[ad_2]

Related posts