[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
What Happened on July 20th This Day in History : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 20 जुलै रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. आजच्या दिवशी 1969 मध्ये आंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पहिल्यांदा पाऊल ठेवलं होतं आणि संपूर्ण जग रोमांचित झालं होतं. दरवर्षी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस 20 जुलै रोजी साजरा करण्यात येतो. याशिवाय इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.
नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले-
आजच्या दिवशी म्हणजे 20 जुलै 1969 रोजी आंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पहिल्यांदा पाऊल ठेवलं होतं आणि संपूर्ण जग रोमांचित झालं होतं. अपोलो-11 च्या माध्यमातून एल्विन ऑल्ड्रिनच्या साथीने नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पहिल्यांदा पाऊल ठेवलं होतं. हे चंद्रावर ठेवलं गेलेलं पहिलं मानवी पाऊल होतं.
नील आर्मस्ट्राँग हे 200 पेक्षा जास्त प्रकारची विमाने उडवायचे. ड्रायव्हिंग परवान्यापूर्वी त्यांना वयाच्या 16 व्या वर्षी पायलटचा परवाना मिळाला होता. 1966 मध्ये जेमिनी-8 वर कमांड पायलटची भूमिका घेत नील यांना नासाचा पहिला नागरी अंतराळवीर ठरला होता. आर्मस्ट्राँगने 1971 मध्ये अमेरिकेची अंतराळ संस्था नासा सोडली. मग त्याने विद्यार्थ्यांना अंतराळ अभियांत्रिकीविषयी शिकवण्यास सुरुवात केली. त्यांनी हृदयरोगाशी झुंज देत होता. त्यांचे ऑपरेशन झाले. मात्र, नंतर त्यांची प्रकृती अधिकच खालावली. 25 ऑगस्ट 2012 रोजी त्यांचे निधन झाले.
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस International Chess Day
दरवर्षी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन हा 20 जुलै रोजी साजरा केला जातो. बुद्धिबळ हा फार जुना खेळ आहे. FIDE म्हणजे ‘वर्ल्ड चेस ऑर्गनायझेशन’या आंतरराष्ट्रीय संस्थेचा जन्मदिवस ‘जागतिक बुद्धिबळ दिन’म्हणून साजरा केला जातो. बुद्धिबळ हा केवळ एक खेळ नाही तर त्यातून रणनीती बनवण्याची क्षमता विकसित होते आणि तुमची दृश्य स्मरणशक्तीही वाढते. तुम्हाला माहीत असेलच, हा रणनीतीवर आधारित बोर्ड गेम आहे. म्हणूनच ते खेळल्याने रणनीती बनवण्याची क्षमता विकसित होते.
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस 20 जुलै 1966 रोजी फेडरेशन इंटरनॅशनल डेस इचेक्स (FIDE) च्या स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. त्याचवेळी युनेस्कोने 20 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन म्हणून घोषित करण्याची सूचना केली.
नसिरुद्दिन शाह यांचा जन्म –
बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दिन शाह यांचा जन्म 20 जुलै 1950 रोजी झाला. 1975 पासून ते चित्रपटात सक्रिय आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक अजरामर भूमिका केल्या. मासूम, कर्मा, इजाज़त, जलवा, हीरो हीरालाल, गुलामी, त्रिदेव, विश्वात्मा, मोहरा गर्ल इन येलो बूट्स, डर्टी पिक्चर, 7 खून माफ, तेरा सुररूर या चित्रपटांमधील नसिरुद्दीन शाह यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती.
1943 : कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक वामन मल्हार जोशी यांचे निधन
वामन जोशी हे मराठी कादंबरीकार, साहित्यसमीक्षक आणि तत्त्वचिंतक होते. त्यांचा जन्म कुलाबा जिल्हातील तळे या गावी झाला. पुण्याच्या डेक्कन कॉलेजातून तत्त्वज्ञान आणि तर्कशास्त्र हे विषय घेऊन ते एम्.ए. झाले. त्यानंतर त्यांना वि. गो. विजापूरकर कोल्हापूर येथे राष्ट्रीय शिक्षण योजनेखाली चालविलेल्या समर्थ विद्यालयात अध्यापनाचे काम केले. विजापूरकरांच्या बरोबर विश्ववृत या मासिकाच्या संपादनाची जबाबदारीही स्वीकारली.
1929 : हिंदी चित्रपट अभिनेते राजेंद्र कुमार यांचा जन्म
राजेंद्र कुमार यांचा जन्म 20 जुलै 1929 रोजी सियालकोट पंजाब येथे झाला. 60 ते 70 या दशकातील ते एक प्रसिद्ध अभिनेते होते. राजेंद्र कुमार यांनी आपली चित्रपटातील कारकीर्द जोगन या चित्रपटापासून केली. या चित्रपटात त्यांनी दिलीप कुमार आणि नर्गिस यांच्यासमवेत काम केले आहे. 1957 मधील मदर इंडिया या चित्रपटात त्यांनी नर्गिस यांच्या मुलाची भूमिका केली आणि ती खूप गाजली.
1921 : बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक पंडित सामताप्रसाद यांचा जन्म
प्रसिद्ध तबलावादक पं. सामताप्रसाद हे बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक होते. त्यांचा जन्म 20 जुलै 1921 रोजी झाला. सामताप्रसाद उर्फ गुदई महाराज यांचे घराणेही अतिशय मोठे व नावाजलेले होते. तबल्यातील अक्षरांचा कमालीचा सुस्पष्टपणा आणि त्याबरोबरच गोडवा, तबला – डग्ग्याच्या नादातील समतोल, बोलांच्या आकर्षकतेचा उत्कृष्ट अविष्कार आणि या सर्वांना व्यापून टाकणारी प्रासादिकता ही त्यांची वैशिष्ट्ये होती. 31 मे 1994 रोजी त्यांचे निधन झाले.
1911 : बाका जिलानी यांचा जन्म.
बाका जिलानी यांचा जन्म 20 जुलै 1911 मध्ये पंजाब मधील जालंधर येथे झाला. जिलानी हे एक उत्तम फलंदाज होते. त्याशिवाय गोलंदाजीतही त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. रणजी ट्रॉफीमध्ये हॅट्ट्रीक घेणारे ते पहिले गोलंदाज आहेत. 30 वर्षांचे असताना त्यांचे निधन झाले. भारताकडून त्यांनी एक कसोटी सामना खेळला.
1976 : देबाशिष मोहंती यांचा जन्म.
ओडिसामधील भुवनेश्वर येथे देबाशिष यांचा जन्म झाला. त्यांनी भारतीय क्रिकेटसंघाला मोठं योगदान दिलेय. देबाशिष मोहंती यांनी दोन कसोटीत चार विकेट घेतल्या तर 45 वनडेमध्ये 57 विकेट त्यांच्या नावावर आहेत. वनडेमध्ये 10 झेल घेतले आहेत.
1296 : अलाउद्दीन खिलजीने स्वत:ला दिल्लीचा बादशाह म्हणून घोषीत केले.
1654 : अँग्लो-पोर्तुगीज करारानुसार पोर्तुगाल इंग्लंडच्या अखत्यारीत आले.
1810 : बोगोटा, न्यू ग्रेनेडा (सध्या कोलंबिया) येथील नागरिकांनी स्वत:ला स्पेनपासून वेगळं करत स्वातंत्र्य घोषित केले.
1807: निकेफोरे नीएपस यांना जगातील पहिल्या इंजिनसाठी पेटंट दिले गेले.
1847 : जर्मन खगोलशास्त्रज्ञ थियोडोर यांनी ब्रॉर्सन-मेटकॉफ धूमकेतू शोधला.
1903 : फोर्ड मोटर कंपनीने पहिली कार बाजारात आणली
1905 : बंगालच्या विभाजनाला भारतीय सचिवांनी मंजूरी दिली.
1908 : बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांच्या पुढाकाराने बँक ऑफ बडोदाची स्थापना झाली.
1944 : दुसरे महायुद्ध – क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गने केलेल्या प्राणघातक हल्ल्यातुन अॅडॉल्फ हिटलर यांचा जीव वाचला.
1951 : जॉर्डनचे शाह अब्दुल्ला प्रथम यरुशलमच्या हल्ल्यात मृत्यू झाले.
1956 : फ्रान्सने ट्यूनिशियाला स्वतंत्र घोषित केले.
1960- सिलॉनच्या राष्ट्रपती सिरिमावो भंडार नायके यांची जगातील पहिली महिला राष्ट्रपती म्हणून निवड झाली.
1965 : क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांचे निधन
1969 : नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले.
1997 : तीस्ता नदीच्या पाणीवाटपाबाबत भारत-बांगलादेश करार.
2002 : उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यादरम्यान विमानसेवा सुरु झाली.
2005 : कॅनाडामध्ये समलैंगिक विवाह कायद्याला मंजूरी देण्यात आली. असा निर्णय गेणारा कॅनडा चौथा देश ठरला.
2007 : मुशर्रफ सरकारने बरखास्त केलेले सरन्यायाधीश इफ्तिखार चौधरी यांना पुन्हा बहाल करण्याचा निर्णय पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला.
2013 : भारतीय राजकारणी खुर्शिद आलम खान यांचे निधन
2015 : पाच दशकांनंतर अमेरिका आणि क्युबा यांच्यामध्ये राजकिय संबंध पुन्हा सुरू झाले.
2017 : रामनाथ कोविंद यांनी भारताचे भारताचे 14 वे राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळला.
[ad_2]