[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
IPL 2024 Head Coach Sanjay Bangar RCB: इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) च्या पॉईंट टेबलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) सहाव्या क्रमांकावर होता. संघानं यंदाच्या हंगामात 14 पैकी 7 सामने जिंकले आहेत, तर 7 सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. आरसीबीनं 2022 मध्ये टॉप 4 संघांमध्ये स्थान पटकावलं होतं. पण तरिदेखील आरसीबीचा संघ चॅम्पियन होऊ शकला नव्हता. आरसीबीच्या सातत्यानं होणाऱ्या पराभवाबाबत अनेक मीम्सही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता याचसंदर्भात आरसीबीनं मोठं पाऊल उचललं आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक संजय बांगर आणि माइक हेसन यांना कार्यमुक्त करण्यात आलं आहे. या दोघांचा संघासोबतचा करार संपला आहे. त्यामुळे आरसीबीकडून आता नव्या हेड कोचची नियुक्ती करण्यात आली आहे. आरसीबीनं नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून अँडी फ्लॉवर यांची नियुक्ती केली आहे.
[ad_2]