[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
प्रथम त्याने ५०० डॉलर्सची लॉटरी जिंकली. यानंतर त्याने लॉटरीचे संपूर्ण पुस्तक विकत घेतले आणि त्यानंतर त्याला १ मिलियन डॉलर्सची लॉटरी जिंकली. फॉक्स न्यूजनुसार, एकदा जेव्हा त्याने त्याच्या तिकीटाची चौथी आणि शेवटची मालिका स्क्रॅच केली, तेव्हा त्याला लॉटरी निघाली. त्याला विश्वास बसत नव्हता की तो कोट्याधीश झाला आहे.
वांग चा म्हणाला की, “मला खरंच लॉटरी लागली की नाही हे याची खात्री करण्यासाठी मी लॉटरी अॅपवर ते स्कॅन केले आणि ते खरे होते यावर माझा विश्वासच बसत नव्हता.” आता तो जिंकलेली रक्कम गुंतवण्याची योजना आखत आहे आणि इतकंच नाही तर तो पूर्वीपेक्षा जास्त लॉटरी तिकिटे खरेदी करेल.
लॉटरीमध्ये एवढी मोठी रक्कम कोणी जिंकण्याची गेल्या काही आठवड्यांतील ही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वी, UAE मध्ये राहणारा भारतीय प्रवासी मोहम्मद आदिल खान याने पहिले FAST5 ग्रँड पारितोषिक जिंकले. आता, त्याला पुढील २५ वर्षे दरमहा AED २५,००० (अंदाजे ५.५ लाख) मिळत राहतील.
लखनऊ येथील वास्तुविशारद मोहम्मद आदिल खान यांनी सांगितले की, त्यांच्या पहिल्या लॉटरी खरेदीमुळे ते इतकी भव्य पारितोषिकं जिंकू शकतील याची त्यांनी कधीही कल्पना केली नव्हती. आदिलला त्याच्या कुटुंबासाठी घर विकत घेण्याचा विचार आहे आणि त्याला इतर गुंतवणुकीच्या संधी देखील शोधायच्या आहेत.
[ad_2]